Fixed Deposit च्या द्वारे सुद्धा होईल रेग्युलर इन्कम, फक्त करा ‘या’ ट्रिक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – फिक्स्ड डिपॉझिट हा सर्वात जास्त सवलतींचा पर्याय मानला जातो, विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी. परंतु, सध्याच्या स्थितीत एफडीवरील व्याजदराचा विचार केला तर बहुतांश गुंतवणुकदार कॉर्पोरेट किंवा कंपनी एफडीत जास्त रूची दाखवतात. मोठे उत्पन्न असणार्‍या गुंतवणुकदारांसाठी कंपनी एफडीत बचत करणे एक पॉप्युलर गुंतवणूक पर्याय आहे. हा त्या लोकांसाठी जास्त नफा देणारा आहे, ज्यांच्यात रिटर्नसाठी जोखीम घेण्याची क्षमता असते. एफडीद्वारे आवश्यक खर्च पूर्ण करण्यात मदत मिळते. सामान्यपणे रिटायर्ड लोक या पर्यायाचा लाभ घेतात.

बँक/कॉर्पोरेट एफडी लॅडरिंग टेक्नीक
बँक एफडी लॅडरिंगमध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या अनेक एफडी केल्या जातात. लिक्विडिटी मॅनेज करण्याची ही चांगली पद्धत मानली जाते. यासाठी तुम्हाला छोट्या-छोट्या गुंतवणुकीसाठी लम्प-सम अमाऊंट ठरवावी लागते. यानंतर ती वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवली जाते.

असा मिळतो लॅडरिंगचा फायदा
समजा, तुम्हाला एखाद्या बँकेत किंवा कॉर्पोरेट एफडीमध्ये एकुण 7 लाख रुपये जमा करायचे आहेत. अशावेळी, 7 लाख रुपयांची केवळ एकच एफडी करण्याएवेजी तुम्ही ती छोट्या-छोट्या एफडीमध्ये विभागा आणि वेगवेगळ्या मॅच्युरिटीसाठी गुंतवणुक करा. जर तुम्ही ही रक्कम 1-1 लाख रुपयांच्या सात एफडीमध्ये विभागली आणि प्रत्येक एफडीला अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, आणि 7 वर्षांसाठी गुंतवणुक केली तर प्रत्येक वर्षी तुमची एक एफडी मॅच्युर होईल. अशाप्रकारे तुमच्याकडे योग्य लिक्विडिटी उपलब्ध असेल. जर एफडी मॅच्युर झाल्यानंतर तुम्हाला पैशांची आवश्यकता नसेल तर ते पैसे पुन्हा एकदा गुंतवू शकता.

दुसर्‍यांदा गुंतवणूक करताना एफडीत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करा. अशाप्रकारे तुम्ही एफडीची एक चेन बनवाल, ज्यामधून योग्यवेळी तुमच्याकडे योग्य पैसा असेल आणि अशाप्रकारे तुम्ही आपली लिक्विडिटीची गरज पूर्ण करू शकता. तुम्ही ही लॅडरिंग आपली सुविधा आणि भविष्यात संभाव्य गरजांच्या आधारावर डिझाईन करू शकता. एफडी लॅडरिंगमध्ये व्याजाची कमाई सरासरी असते.

कॉर्पोरेट एफडीमध्ये सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लान
एएए रेटेड कॉर्पोरेट एफडीवर बँकांच्या एफडीपेक्षा सुमारे 1 ते 2 टक्के जास्त व्याज मिळते. यापैकी काही एफडीवर सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅनची सुद्धा सुविधा मिळते. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला एक छोटी रक्कम डिपॉझिट करू शकता. तुमच्याकडे हा सुद्धा पर्याय असेल की, मॅच्युरिटीनंतरची रक्कम एकदाच काढा किंवा वेगवेगळ्या भागात काढा.

उदाहरणार्थ बजाज फायनान्स एफडीवर एसडीपीची सुविधा देते, जेथे तुम्ही 6 ते 48 डिपॉझिट्स करू शकता. तुम्ही तिचा जो कालावधी निवडता तो सर्व डिपॉझिटवर लागू होतो. या सर्व डिपॉझिट्सवर मॅच्युरिटीची तारीख वेगवेगळी असते. हे डिपॉझिट तुमच्याद्वारे निवडलेल्या कालावधीच्या आधारावर मॅच्युर होते. अशाप्रकारे सुद्धा तुम्ही रेग्युलर इन्कम प्राप्त करू शकता.

जोखीमचाही विचार करा
परंतु, तुम्हाला कॉर्पोरेट एफडीत जोखिमीचा विचार करावा लागेल. एएए कंपनीच्या एफडी उपलब्ध आहेत, परंतु यामध्ये तुमच्या रक्कमेच्या सुरक्षेची कोणतीही गॅरंटी नसते. बँकांमध्ये करण्यात आलेल्या एफडीवर रक्कमेची सुरक्षा जरूर मिळते. कॉरपोरेट एफडीवर इन्कम टॅक्स देय इन्कम टॅक्स स्लॅबच्या आधारावर लागू होतो.