ट्विटरवर ‘हा’ हॅशटॅग झालाय ट्रेन्ड, ‘मी पणा’मुळे ‘CM’ होताहेत ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रचार आपल्याभोवती फिरत ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात तर त्यांनी मी ‘पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असा नारा घसा फाडून दिला. पण, जनतेने तो अव्हरला. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा घोळ वाढला आहे. त्यामुळे आता या व्हिडिओवर व्यंग तयार करुन सोशल मिडियावर मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे.

मुख्यमंत्रीपदी फडणवीस पुन्हा नको, #RejectFadnavisForCM हा हॅश टॅग सध्या ट्रेंड आहे. हा हॅश टॅग वापरुन नेटिझन्स देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू नका अशी मागणी महायुतीकडे करत आहेत. तर अनेक जण असं सुचवत आहेत की शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करायला हवे. जेणेकरुन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदापासून आणि भाजपा सत्तेपासून दूर राहील.

ट्विटरकर देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या ५ वर्षामधील कामगिरीवर नाराज आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूरमधील सर्व पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या, महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला नेले तरी मुख्यमंत्री मुग गिळून बसले.

फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या मार्गातील इतरांना दूर करता करता ते स्वत:च त्यापासून दूर जात असल्याचे सांगत त्यांना काहींनी शेखचिल्लीची उपमा दिली आहे. तर इतका मीपणा कधीच कोणाला आवडत नाही. त्यांनी मी ऐवजी आम्ही परत येईन असे म्हटले पाहिजे होते, असा सूर नेटकऱ्यांनी लावला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:ची अति प्रसिद्धी करुन इतरांना दूर ठेवल्याने आता त्यांच्याबरोबर कोणीही दिसत नाही. अतिप्रसिद्धीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

Visit : Policenama.com