अभिनेत्री रेखाला कल्पना नसताना शुट केला 5 मिनिटांचा ‘KISSING’ सीन ! झाली होती ‘अशी’ अवस्था

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी अभिनेत्री रेखाचा आज 65 वा वाढदिवस आहे. रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नईमध्ये झाला होता. सदाबहार, दिलकश अशा अनेक नावांनी रेखा ओळखली जाते. रेखा आजही तेवढीच सुंदर दिसते म्हणून तिला एव्हरग्रीन म्हटलं जातं. रेखाच्या भांगातील कुंकूही एक रहस्यच आहे. आज आपण वाढदिवसानिमित्त रेखाच्या काही रंजक गोष्टी जाणून घेणार होता.

इच्छा नसताना वयाच्या 12 व्या वर्षी ठेवलं अभिनय क्षेत्रात पाऊल
साऊथचे प्रसिद्ध अ‍ॅक्टर जेमिनी गणेशन यांची ती मुलगी आहे. रेखाची आई पुष्वावल्ली तेलगू अभिनेत्री होती. रेखाला लहानपणापासूनच फिल्मी वातावरण मिळालं आहे परंतु तिला कधी अ‍ॅक्ट्रेस नव्हते व्हायचे. 1966 साली तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. रेखाने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. रेखाच्या आईवर कर्जाचा डोंगर होता. इच्छा नसतानाही रेखाने 12 व्या वर्षी तमिळ सिनेमात कामाला सुरुवात केली. कधी तिला कामाचा खूप लोड यायचा. जर तिने कामाला जायला नकार देत तेव्हा तिचा भाऊ तिला माहराण करत असे. आर्थिक अडचणींमुळे तिने बी ग्रेड सिनेमातही काम केलं आहे.

अभिनेता रेखाला 5 मिनिटं किस करत होता आणि रेखाला रडू कोसळलं

रेखाला सुरुवातीच्या काळात खूप त्रास सहन करावा लागला आहे. दिग्दर्शक राजा नवाठे आणि अभिनेता बिस्वजित यांनी मुद्दाम त्रास देण्यासाठी एक सीन शुट करण्याचं ठरवलं. रेखा त्यावेळी 15 वर्षांची होती. एका रोमँटीक गाण्याच्या शुटसाठी ती सेटवर आली. सीनला सुरुवात झाली त्यावेळी रेखाला अभिनेता बिस्वजितने मिठीत घेतलं आणि अचानक तिला किस करू लागला. रेखाला या सीनची कल्पना नव्हती. रेखाला मात्र या सीनने रडूच कोसळलं. बाकी लोक बिस्वजीत सीनसाठी चिअर करत होते. त्याने तो जवळपास 5 मिनिटे तिला किस करत होता.

Visit : Policenama.com

You might also like