‘बिग बी’ अमिताभचा फोटो पाहून रेखा म्हणाल्या – ‘खतरा’, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा जिथे जिथे जातात तिथे त्यांची चर्चा होतेच. यावेळी जेव्हा त्या डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लॉन्चला पोहोचल्या तेव्हा अशी काही घटना घडली की प्रत्येकजण हसू लागला. रेखा त्या कार्यक्रमाला पोहचल्या तेव्हा त्यांनी डब्बूच्या मुलीबरोबर रॅम्प वॉक करण्यास सुरवात केली, पण जेव्हा त्या थांबल्या तेव्हा समोर अमिताभ बच्चन यांचा फोटो होता. हा फोटो पाहताच रेखा यांनी एक गमतीशीर प्रतिक्रिया दिली आणि म्हणाल्या, ‘इथे डेंजर झोन आहे, चला चला’. त्यांची प्रतिक्रिया ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हसायला लागले.

मायानगरीमध्ये रेखा आणि अमिताभ यांच्या मैत्रीच्या चर्चा सामान्य झाल्या आहेत. दोघे 1976 मध्ये ‘दो अंजाने’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते, त्यानंतर त्यांच्या जवळीकतेच्या बातम्या येऊ लागल्या. अभिनेत्री सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये रेखा यांना विचारले होते की, एकत्र काम करताना त्या अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या होत्या का? रेखा यांनी उत्तर दिले की, ‘नक्कीच, हा काय मूर्ख प्रश्न आहे. आजपर्यंत मी अशा कोणत्याही व्यक्तीला, स्त्रीला किंवा मुलाला भेटले नाही, जो त्यांच्यावर प्रेम करीत नाही.’

त्याच मुलाखतीत रेखा यांनी हे देखील स्पष्ट केले की, वर्तमानपत्राने काही छापले तरही अमिताभ यांच्याशी त्यांचे काही वैयक्तिक संबंध नव्हते, त्यांचे अमिताभ यांच्यावर असलेले प्रेम चाहत्यांसारखे होते.

जेव्हा सिमिने अमिताभ यांना याविषयी प्रश्न केला की, रेखाबरोबरच्या संबंधांबद्दल बातम्या का येत असतात? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ‘हे प्रकरण माध्यमांना विचारा. ती माझी को स्टार होती. आम्ही एकत्र काम करायचो पण याला काहीतरी वेगळंच बनवल गेलं आहे. या आरोपांचा मी खूप सामना केला आहे. काही आरोप खूप मूर्ख होते की मी तिच्याबरोबर राहायला गेलो आहे किंवा ती माझ्याबरोबर राहायला आली आहे. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता माझ्यावर आरोप करण्यात आला. तशी, आमच्या दोघांची केमिस्ट्री स्क्रीनवरही सुपरहिट होती.’ हे दोघे ‘मिस्टर नटवरलाल’, ‘मुकद्दार का सिकंदर’ आणि ‘सिलसिला’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसले आहे.

You might also like