रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठे 82 दिवसांपासून वेशांतर करून राहत होता हैदराबादमध्ये, ‘उस्मानिया’तील एकानं दिला होता ‘आश्रय’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे गेल्या काही दिवसांपासून फरार होता. आज अखेर ८२ दिवसांनंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तो हैदराबादमध्ये ८२ दिवसांपासून वेशांतर करून राहत होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात यश आले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा हैदराबादमध्ये एका हॉटेलमध्ये लपला होता. जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. तो हैदराबादमध्ये उस्मानिया विद्यापीठातील अ‍ॅड. जनार्दन चंद्राप्पा या व्यक्तीने त्याला आश्रय दिला होता, तर अहमदनगर येथून महेश वसंतराव तनपुरे हा बोठे याच्या संपर्कात होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ५ दिवस बिलालनगर परिसरात बोठेचा शोध घेतला. त्यावेळी तो २ ते ३ वेळा पोलिसांना गुंगारा देऊन पळण्यात यशस्वी झाला होता. मात्र, या टाईमला तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मुंबई पोलीस आणि हैदराबाद पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली आहे. आज संध्याकाळी त्याला नगरमध्ये आणल्यानंतर पारनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जर्नादन अकुला चंद्राप्पा, रंगारेड्डी, पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी, राजशेखर अंजय चाकाली, शेख इस्माईल, शेख अली, अब्दुल रहमान, अब्दुल आरीफ या व्यक्तींनी बाळ बोठे यास हैदराबादमध्ये मदत केली होती.