Rekha Jare Murder Case | बाळ बोठेच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  Rekha Jare Murder Case | अहमदनगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील (Rekha Jare Murder Case) मुख्य आरोपी बाळ बोठे (Bal bothe) याचा आज (बुधवारी) जिल्हा न्यायालयाने (Nagar District Court) जामीन (Bail) अर्ज फेटाळला आहे. बोठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी त्याचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान बोठे याच्यातर्फे ॲड. महेश तवले (Adv. Mahesh Tawale) तर फिर्यादी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील (Adv. Umeshchandra Yadav Patil) आणि ॲड. सचिन पटेकर (Adv. Sachin Patekar) यांनी युक्तीवाद केला होता.

सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. उमेशचंद्र यादव पाटील (Adv. Umeshchandra Yadav Patil) म्हणाले की, जामीन मिळाला तर आरोपी फरार होऊ शकतो तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. बोठे याने रेखा जरेंशी वितुष्ट आल्यानंतर कट रचून शांत डोक्याने त्यांची हत्या घडवून आणली आहे. खुनाच्या घटनेनंतर (Rekha Jare Murder Case) अटकेच्या भीतीने 100 पेक्षा जास्त दिवस तो तेलंगणा राज्यात लपून बसला होता. आरोपीचे वर्तन लक्षात घेत त्याला जामीन देऊ नये, असं ॲड. यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बदनामी होण्याच्या भितीतून बाळ बोठे याने सुपारी देऊन 30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे यांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बोठे सध्या पारनेर येथील कारागृहात न्यायालयीन कस्टडीत आहे. दरम्यान, बाळ बोठे याने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.

 

Web Title : Rekha Jare Murder Case | The district court took a ‘yes’ decision on Bal Bothe’s bail application

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये भरपाई मिळणार; केंद्राची SC ला माहिती

Pune News | इमारतीचं बांधकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला मजूर; 2 तासानंतर सुटका

Pune Anti Corruption | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकार्‍यासह एका संस्थेचा सचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ