रेखा जरे हत्याकांड : बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांच्या जीवितास धोका, पोलिस संरक्षणाची मागणी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – नगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांनी आरोपींपासून जीविताला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी रविवारी केली. दरम्यान त्यांचा जबाबही पोलिसांची नोंदवला आहे. आजही त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

३० नोव्हेंबरला जर यांची हत्या झाली त्यावेळी माने या त्यांच्यासोबतच होत्या. हि हत्या त्यांनी पहिली असून माने यांनीच जरे यांना रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. या हत्याकंधामध्ये मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे त्यामुळे आरोपींपासून माझ्या जीवितास धोका असल्याची शक्यता असून मला पोलीससंरक्षण मिळावे, अशी मागणी माने यांनी तपास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मी फरार नाही
रेखा जरे यांची हत्या मी प्रत्यक्ष पाहिल्याने माझ्या प्रकृतीत बिघाड झाला. माझा रक्तदाब वाढला. माझी आईही घाबरून गेली होती. कामानिमित्त मी दोन दिवस गावी गेले होते. मात्र, मी पोलिसांच्या संपर्कात होते. त्यामुळे मी फरार झाल्याची चर्चा चुकीची आहे. रविवारी तपास अधिकाऱ्यांकडे जबाब नोंदविला आहे. सोमवारी जबाब नोंदवणार असून पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहे, असे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांनी सांगितले.