अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून रेखा यांनी दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन !

मुंबई :वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने १९८० चे दशक गाजवणारी अभिनेत्री रेखा आज जरी बॉलिवूड पासून दूर असल्या  तरी कोणत्या तरी कार्यक्रमात दिसून येतात नुकतेच डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लॉचिंग कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री रेखा फोटो शुट करत होत्या. त्याचदरम्यान रेखा यांनी अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहताच दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये रेखा डब्बू रतनानी आणि मुलांसोबत फोटोशुट करत असल्याचे पाहयला मिळत आहे. त्याचदरम्यान काही फोटोग्राफर्सनी त्यांचे वैयक्तिक फोटो काढण्यासाठी रेखा यांना बाजुला बोलावाले. त्या आल्याही पण त्या जेथे उभारल्या होत्या तेथे मागे अमिताभ यांचा फोटो लावला होता. त्या पोज देण्यसाठी मागे वळल्या, अमिताभ यांचा फोटो पाहताच रेखा पटकन मागे सरकल्या. रेखा यांच्या या रिॲक्शनवरुन त्यांना या फोटोचा भविष्यात वेगळ्याच कारणासाठी वापर होऊ शकतो याची जाणीव झाल्याने त्यांनी सावध पवित्रा घेतला असण्याची शक्यता आहे.

अमिताभ आणि रेखा यांचे नाते जगजाहीर आहे. अगदी सुरुवातीपासून अमिताभ आणि रेखाच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या खुद्द रेखा यांनी एका जुन्या मुलाखतीमध्ये अमिताभबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

https://www.instagram.com/p/BtNTZvSg-YW/?utm_source=ig_embed