अभिनेत्री रेखा वाढत्या वयासोबत दिसते आणखीनच HOT ! (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री रेखा आपल्या सौंदर्यामुळे प्रत्येकाला वेड लावत असते. सध्या रेखाचा एक फोटो सोशलवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोने अनेकांचा दिवस बनवला. या फोटोत रेखा खूपच सुंदर दिसत आहे. रेखाचं सौंदर्य पाहून जो तो तिच्यावर फिदा होत आहे. अतिशय मोहक असा हा फोटो आहे. चाहत्यांकडून हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B2NQS_OJelh/?utm_source=ig_embed

रेखा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या स्टोरमध्ये आली होती. जिथे तिने पांढऱ्या रंगाचा काफ्तान घातला होता. या ड्रेसमध्ये रेखा कमाल दिसत होती. सध्या रेखाचा हा व्हाईट आउटफिटमधील फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. पांढऱ्या रंगाचा काफ्ताना तिला खूपच सूट करत आहे. तिने या आउटफिटला मॅच करण्यासाठी गळ्यात पांढरी सिल्कची ओढणीही कॅरी केली आहे. या वयातही रेखा खूपच सुंदर दिसत आहे. रेखा सौंदर्यासोबतच फॅशनच्या बाबतीतही इतर अभिनेत्रींना मात देत आहे. तिचा हा नवीन लुक सर्वांनाच आवडला आहे.

नुकत्याच झालेल्या आयफा अवॉर्ड 2019 दरम्यान रेखा आलिया भट्टचा गली बॉयमधील डॉयलॉग स्टेजवर बोलताना दिसून आली. आलिया आधी डायलॉग बोलते आणि मग नंतर रेखा डायलॉग घेते. रेखा म्हणते, “मेरे ब्वॉयफ्रेंड से गुलू गुलू करेगी, ढोपदूंगी ना उसको!” तिचा हा अंदाज पाहून तिथे उपस्थित सर्व लोक टाळ्यांचा गडगडाट करत तिचं कौतुक करतात.