नववधू बनून सासरी गेलेल्या रेखासोबत घडली होती ‘ही’ विचित्र घटना, त्यानंतर कधीच लग्न न करण्याचा घेतला निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन – सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा. सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. आजही त्या तेवढ्याच सुंदर आणि उत्साही दिसतात. बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे. रेखा सध्या चित्रपटात काम करत नसल्या तरी आजही त्यांचे लाखो चाहते आहेत. रेखाच व्यावसायिक जीवन जितक गाजल तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरले आहे. त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहिती नाही प्रत्येकाकडे उलटसुलट माहिती आहे.

रेखा आणि विनोद मेहरा यांनी ब-याच चित्रपटात काम केले आहे. काम करता करता दोघांमध्ये एक प्रेमाचे नात निर्माण झाले. दोघंही लग्नबंधनात अडकले. मात्र मेहरा यांच्या मनातील पत्नी रेखा बनू शकल्या नाही. इतकेच नाही तर विनोद मेहरा यांच्या मातोश्रींनाही रेखा सून म्हणून पसंद नव्हत्या. लग्न करुन नववधू बनलेली रेखा मेहरांच्या घरी पोहचली.

मेहरा यांच्या आईने रेखाला आपली सून मानण्यास आणि गृहप्रवेश देण्यास नकार दिला. नववधूच्या रुपात आलेल्या रेखाने घराची एक पायरीही चढता आली नव्हती असे बोलले जाते. त्यावेळी आई आणि पत्नी यापैकी एकाची निवड करण्यास रेखा यांनी विनोद मेहरांना सांगितले. त्यावेळी मेहरा यांनी प्रेमाऐवजी आपल्या आईला निवडले होते. यामुळेच रेखा यांच्या आयुष्यातून विनोद मेहरा निघून गेले होते. या घटनेनंतर त्यांनी कधीच लग्न न करण्याचाच निर्णय घेतल्याचे बोलले जाते.