Relationship ! ‘इथं’ पुरूषांचे जबरदस्तीने 2 विवाह लावण्याची परंपरा, नकार देणार्‍यास दिली जाते शिक्षा

नवी दिल्ली : Relationship | जगात असे अनेक देश आहेत, जिथे एक नव्हे तर दोन विवाह करण्याची प्रथा आहे. इतकेच नव्हे, तर दुसर्‍या विवाहासाठी पुरुषांवर जबरदस्ती केली जाते. जर एखाद्या पुरुषाने दुसरा विवाह करण्यास नकार दिला, तर त्यास शिक्षा केली जाते. अफ्रीका खंडातील एक देश आहे जिथे दोन पत्नी (Relationship) करण्याचा आगळावेगळा कायदा आहे.

आफ्रिकन देश इरिट्रियामध्ये प्रत्येक पुरुषाला दोन विवाह करावे लागतात. कारण या देशात दोन विवाह करणे अनिवार्य आहे. इतकेच नव्हे, जर कुणी पुरुष दोन पत्नी करत नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते, शिक्षा म्हणून त्याला जेलमध्ये सुद्धा टाकले जाते.

या आगळ्यावेगळ्या कायद्याचे कारण हे आहे की, इरीट्रियामध्ये महिलांच्या संख्येत पुरुषांची संख्या खुप कमी
आहे. ज्याचे प्रमुख कारण इथियोपियासोबत झालेले गृह युद्ध आहे. पुरुषांच्या दोन विवाहासह महिलांसाठी सुद्धा एक कठोर कायदा बनवण्यात आला आहे.

या कायद्याच्या अंतर्गत तिथे राहणार्‍या महिला आपल्या पतीच्या दुसर्‍या विवाहात अडथळा आणण्याचा
कोणताही प्रयत्न करू शकत नाहीत, जर त्यांनी असे केले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा केली जाते.

जगभरातील प्रत्येक देशात वेगवेगळे रिती-रिवाज आहेत ज्यामुध्ये अफ्रीका खंडातील देशांमध्ये अशाप्रकारचे अनेक कायदे आहेत, जे जगातील इतर देशांमध्ये नाहीत.

हे देखील वाचा

NLEM | सरकारने कॅन्सर, डायबिटीज, कोविड आणि टीबीसह 39 औषधांच्या कमी केल्या किमती, पहा यादी

News Rules | वाहनांच्या ‘पाँ-पाँ’, ‘चाँ-चाँ’पासून मिळेल मुक्ती ! हॉर्न वाजवल्यास ऐकू येईल ‘बासुरी’ अन् ‘व्हायलियन’ची धुन; सरकार लागु करतंय नवीन नियम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Relationship | here is the tradition of men forcibly getting two marriages harsh punishment is given to those who refuse

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update