Relationship Tips | मुलांच्या ‘या’ कृत्याचा मुली करतात जबरदस्त तिरस्कार, जातात दूर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Relationship Tips | प्रत्येक मुलाच्या मनात एक मुलगी असते. ती मुलगी त्याची मैत्रिण असेल किंवा वर्गमित्र असेल.पण हे नात जेव्हा प्रपोजपर्यंत जाते. तेव्हा अनेकदा मुली या मुलांचे प्रपोजल धुडकावून लावतात. मग मुलांच्या मनात प्रश्न येतो की त्यांचा प्रस्ताव का नाकारला गेला. त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे मुलांना नकार देण्यात आला. मुलांचा प्रस्ताव फेटाळण्यामागे अनेक कारणे आहेत. प्रपोज करणार्‍यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. प्रस्ताव का फेटाळण्यात आला? खरं तर मुलं घाईघाईत काही चुका करतात. त्यामुळे त्यांचे प्रस्ताव नाकारले जातात. जाणून घेऊया अशा कोणत्या सामान्य चुका आहेत ज्यामुळे मुलांचे प्रस्ताव नाकारले जातात (Relationship Advice). जर तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा प्रस्ताव नाकारला जाऊ शकत नाही (Relationship Tips).

 

जास्त आत्मविश्वास ठेवा (Be More Confident) :
काही मुले अति आत्मविश्वासू असतात आणि मुलीला प्रपोज करण्यापूर्वी ते मनातल्या मनात मांडे खातात. पण काही मुले खुपच आत्मविश्वासू राहतात. आपण ज्या मुलीला भेटणार आहोत. ती मुलगी आपल्याबरोबर कम्फर्टेबल आहे की नाही, हे न पाहता तिला प्रपोज करतात. मग काय नकार मिळतो (Relationship Tips).

 

मित्रांच्या ग्रुपचा आग्रह (Friends Group Insisted) :
बर्‍याचदा मित्रांच्या ग्रुपमध्ये मुलींना पटविण्याच्या पैजा लागतात. मग फारशी ओळख नसताना मुलींना प्रपोज करण्यासाठी पुढे सरसावतात. अशा परिस्थितीत कुठलीही भावना नसताना केवळ पैज जिंकण्यासाठी हा प्रस्ताव ठेवला जातो. साहजिकच त्याला नकार मिळतो.

जाणून न घेता (Without Knowing)…
नुकतीच ओळख झाली. तिची मत जाणून न घेतली आणि त्याशिवाय प्रपोज करायला जर गेलात तर तुम्हाला नक्कीच नकार मिळण्याची शक्यता आहे. कारण ओळख नाही, मैत्री नाही, अन् थेट प्रपोज. ही बाब मुलींना खटकते. कारण विचार करायला वेळ मिळत नसल्यामुळे पटकन होकार मिळण्याची चिन्हे मावळतात. आजवर प्रेमाचे नात अस डायरेक्ट निर्माण झाल्याचे ऐकिवात नाही. अगोदर ओळख, मग आवडीनिवडी, मग मैत्री पक्की होते. बर्‍याच कालावधीनंतर मैत्री टिकल्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात होते. त्यामुळे मैत्री नसलेल्या मुलीला प्रपोज केल्यास नकार पक्का ठरलेला आहे.

 

वारंवार कॉल (Frequent Calls) …
एखादी मुलगी तुमची मैत्रिण आहे. जर वारंवार तिच्याशी बोलत असाल किंवा नेहमी मेसेज करत असाल.
तर तुमच्याविषयीची खराब प्रतिमा तिच्या मनात तयार होईल. तुम्ही फारच निर्लज्ज आहात,
असा तिचा गैरसमजही होऊन नकार मिळण्याची भिती असते. त्यामुळे या टिप्स नक्की लक्षात ठेवा.
असे वागू नका. अगोदर ओळख, मग मैत्री, मग प्रेम या मार्गानेच प्रपोज करा, नक्की यश मिळेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Relationship Tips | reason girls dont like some boys why do girls reject boys proposals for a relationship

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Clotting Signs And Symptoms | अशी लक्षणं दिसल्यास लगेच सावध व्हा, नाहीतर रक्त गोठण्यामुळे होईल जीवघेणा त्रास

 

Steroids Affects | आकर्षक दिसण्यासाठी कुठेतरी तुम्ही स्टेरॉइडचा वापर करत नाही ना?

 

Yoga Asanas For Hormonal Imbalance | हार्मोन असंतुलनामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात; ‘या’ आसनांच्या मदतीने मिळू शकतात फायदे