Relationship : ‘या’ 4 संकेताद्वारे ओळखा, तुमचा बॉयफ्रेंड आयुष्यभर ‘साथ’ देईल किंवा नाही

पोलीसनामा ऑनलाइन – जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा केवळ दोन लोकांचे मिलन नसते, तर अनेक अशा गोष्टीसुद्धा असतात, ज्या तुम्हा दोघांना जोडण्याचे आणि तोडण्याचे काम करतात. अनेक लोक असे असतात, जे पार्टनरलाच लाइफ पार्टनर निवडण्याचा विचार करतात. परंतु, यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, तुमचा पार्टनर तुमच्यासोबत आयुष्यभर राहू शकतो किंवा नाही. तुम्ही हे समजू शकत नाही की, तुमचे नाते कोणत्या दिशेला जात आहे. ही एक अशी समस्या असते, जी तुम्हाला नाही, तर अनेक लोकांना त्रस्त करते. यासाठी हे जाणून घेणे जरूरी आहे की, ज्या व्यक्तीला तुम्ही डेट करत आहात तो मोठ्या कालावधीपर्यंत तुमच्या सोबत राहील अथवा नाही. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आयुष्य घालवण्याचा विचार करत आहात, तो तुमच्यासोबत कायम राहू शकतो किंवा नाही, हे कसे ओळखावे ते जाणून घेवूयात…

1 एकमेकांचा खरेपणा जाणून घ्या
जर तुम्ही कुणाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहात, तर तुम्हाला स्वताला या जगात येण्यास कुणीही रोखू शकत नाही. तुम्ही आणि तुमचा पार्टनर दोघांत तुमची स्वप्न, शंका, आशा, प्रेरणा इत्यादी शेयर करता. मात्र, जर तुम्ही दोघे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवता, परंतु तुमचा पार्टनर तुमच्याशी आपले जीवन किंवा स्वप्नांबाबत काहीच बोलत नाही, तर शक्यता आहे की, तो कधीही तुमचा होऊ शकत नाही.

2 पार्टनरचा तुमच्यापासून दूर राहाण्याचा प्रयत्न
असे तर पार्टनर नेहमी भेटणे, बोलणे आणि सोबत राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जर तुमचा पार्टनर नेहमी तुमच्यापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्याशी बोलत नसेल तर स्थिती गंभीर होऊ शकते. अशावेळी तुम्ही त्याच्या पाठीमागे तुमचा वेळ वाया घालवू नका. यातून तुम्ही समजले पाहिजे की, अशी व्यक्ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहू शकत नाही.

3 भावनात्मक संबंध नसणे
प्रत्येक कपल आपल्या नात्यात मजामस्ती करणे पसंत करते. परंतु तुमचा जोडीदार तुमच्या गोष्टी टाळत असेल आणि तुम्हाला भावनात्मकदृष्ट्या समजून घेण्याचा प्रयत्न करत नसेल, तर हे या गोष्टीकडे इशारा करते की, तो तुमच्या हृदयाशी नाही तर केवळ शरीराशी जोडलेला आहे. अशा व्यक्तीसोबत आयुष्यभर राहण्याचा विचार सोडून द्या.

4 शारीरीक संबंध ठेवण्यात जास्त रस असेल
अशी अनेक नाती असतात, ज्यामध्ये पार्टनर्स केवळ शारीरीक संबंध ठेवण्यासाठीच एकमेकांसोबत राहतात आणि वेळ घालवतात. परंतु तुम्ही त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचा विचार करत असाल, तर अशावेळी हे पहाणे आवश्यक आहे की ती व्यक्ती तुमच्याशी हृदयापासून जोडलेली आहे की केवळ शारीरीक प्रकारे. शारीरीक संबंधाशिवाय तुम्ही भावनात्मक संबंधाला महत्व द्या आणि एकमेकांचे विचार शेयर करा. जर तुमचा पार्टनर तुमच्याशी शारीरीक संबंध ठेवण्याशिवाय अन्य कोणत्याही गोष्ठीकडे लक्ष देत नसेल तर तुम्ही त्याच्यापासून तोबडतोब दूर व्हा.