Valentine Day 2020 : भारताच्या इतिहासात अमर झालं ‘या’ जोडयांची ‘प्रेम कहाणी’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – व्हॅलेंटाईन आठवडा सध्या सुरु असल्यामुळे सर्वत्र उत्साही वातावरण पहायला मिळते. कॉलेजेस किंवा कंपन्यांमध्ये मोठी सजावट या निमित्त पाहायला मिळते. प्रेमी तरुणांसाठी हा दिवस खूप आनंदाचा समजला जातो. आपल्या देशात देखील ताजमहाल पासून ते मांडव पर्यंत अनेक प्रेमाची प्रतीके आहेत तसेच अशा अनेक प्रेमकथा देखील आहेत आज आपण त्याबद्दलची माहिती घेणार आहोत.

जगभरातील प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल, मुघल सम्राट शाहजहां आणि मुमताज यांच्या अमर प्रेमाची कहाणी सांगते. शाहजहांने आपल्या बेगम मुमताजसाठी पांढरा संगमरवरी किल्ला बांधला, जो ताजमहाल म्हणून प्रसिद्ध आहे. सम्राट आणि त्याच्या बेगमची कब्र ताजमहालमध्ये आहे.

पृथ्वीराज चौहान राजा कन्नौजचे राजा जयचंद यांची मुलगी संयुक्ताच्या प्रेमात पडले होते. जयचंद यांना जेव्हा हे कळले तेव्हा तो फार संतापला आणि त्याने संयुक्ताचा स्वयंवराचे आयोजन केले. यामध्ये त्याने अनेक राजपुत्रांना बोलावले पण जयचंद यांनी पृथ्वीराजांना आमंत्रण दिले नाही आणि त्याच्या दरबाराबाहेर त्यांचा दरबारी म्हणून पुतळा उभारला. मात्र ज्यावेळी संयुक्ताला दरबारातील कोणालाही हार घालण्यास सांगितले तेव्हा तिने दरवाजावरील पृथ्वीराज यांच्या पुतळ्याला हार घातला. त्यावेळी त्या पुतळ्यामागे पृथ्वीराज स्वतः येऊन थांबले होते आणि सर्वांसमोर त्यांनी तिला पळवून देखील नेले.

मध्य प्रदेशातील मालवा राजातील राजा बाजबहादूरची प्रेमकथा आजही इथल्या किल्ल्यांमध्ये आहे. शिकारीसाठी गेलेला राजा एका सामान्य स्त्रीच्या प्रेमात पडला. जगाचा विचार न करता बाजबहादूरने रूपमतीशी लग्न केले आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

बाजीराव मस्तानीची देखील अशीच कहाणी आहे विशेष म्हणजे यावर चित्रपट आल्यानंतर याकडे सर्वांचे लक्ष गेले. बाजीरावने देखील बुंदेलखंडातील छत्रसालची मुलगी असलेल्या मस्तानीवर प्रेम केले होते. समाजाने त्यांचा विवाह मान्य केला नाही परंतु ते शेवटपर्यँत एकमेकांवर प्रेम करत राहिले.

शूरवीर राजांच्या प्रेमकहाण्या देखील खूप रोचक आहेत अशीच एक कहाणी राजा बिंबिसारची देखील आहे. हा राजा राज्यातील सर्वात सुंदर नाचणाऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडला होता. राजा युद्धात जखमी झाला असताना आम्रपालीने राजाची सेवा साधारण सैनिक म्हणून केली होती. त्यानंतर आम्रपालीच्या नृत्यावर आकर्षित होऊन राजाने तिच्यासोबत विवाह केला होता.

You might also like