Relationship With Partner | प्रेम व्यक्त करण्याच्या प्रयत्नात ‘पार्टनर’ तुमच्यावर कंट्रोल तर करत नाही ना? ‘या’ 6 संकेतावरून ओळखा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Relationship With Partner | तुमचा पार्टनर (मुलगा किंवा मुलगी) तुमच्यावर खुप प्रेम करत असेल आणि याबाबत तुमच्या मनात शंकाही नसेल. परंतु त्याला तुमचे स्वातंत्र्य आवडत नसेल तर? अनेकदा जेव्हा पार्टनर आपली चिंता आणि काळजी करतो तेव्हा खुप चांगले वाटते. एका सदृढ नात्यासाठी हे आवश्यक आहे. परंतु संकट तेव्हा येते, जेव्हा हे केयर आणि प्रोटेक्शन प्रमाणापेक्षा जास्त होते. पार्टनर एकप्रकारे तुमच्यावर मालकी हक्क दाखवू (Relationship With Partner) लागतो. अशावेळी नाते खुप लवकर कडू होऊ लागते (6 Indications of over-protective or over-controlling partner).

ओव्हरप्रोटेक्टिव्ह किंवा ओव्हर कंट्रोलिंग पार्टनरचे संकेत (Relationship With Partner)

1. पुढील विचार न करता प्रेम दर्शवणे
सर्वप्रथम असे पार्टनर हे पहात नाहीत की, हे नाते कुणीकडे जात आहे. हे तुमच्यासाठी काम करू शकते किंवा नाही. ते अगोदरच आपले प्रेम व्यक्त करतात आणि तुमच्याकडून सुद्धा हीच अपेक्षा करतात. ते तुम्हाला मस्का सुद्धा लावतात की तुमच्या येण्याने त्याला किती आनंद मिळतो आणि तुम्हाला सुद्धा असे वाटावे असे त्यांना वाटते.

2. ते तुमच्या मित्रांवर जळतात
त्यांना असे वाटते की, तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याच्यासोबत फ्लर्ट करत आहात. सर्व व्यक्तींना तुमच्या सोबत केवळ रिलेशनमध्येच यायचे आहे. जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत किंवा आपल्या मित्रासोबत बोललात तरीसुद्धा त्यांची जळजळ होते. तुम्ही असे करू नये असे त्यांना वाटते. ते नेहमी तुम्हाला प्रश्न विचारतात.

3. ते तुम्हाला मित्रांपासून वेगळे करू पाहतात
जर तुमचा पार्टनर ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे तर तो तुमच्या मित्रांना, विशेषता विरूद्ध जेंडरच्या लोकांपासून तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करतो. तुमचा पार्टनर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा जास्त उठ-बस करू देत नाही. तो त्याच्याशिवाय इतर कुणाशीही तुम्हाला बोलू देत नाही.

4. निगेटिव्ह फिलिंग्जसाठी तुमच्यावर ब्लेम
जेव्हा तुमचा पार्टनर खुप लवकरत संतापतो किंवा खुप निगेटिव्ह होतो तेव्हा तो आपल्या मनातील या सर्व भावनांना तुम्हाला जबाबदार ठरवतो. तो स्वताला नेहमी अशा स्थितीत व्हिक्टिमप्रमाणे दर्शवतो.

5. ते तुमच्या कपड्यांबाबत निर्णय घेतात
तुम्ही काय घालावे किंवा काय घालू नये हे तुमचा पार्टनर ठरवतो तेव्हा त्याचा अर्थ आहे तो खुप जास्त पझेसिव्ह होत आहे.

6. पार्टनर सतत तुमच्यावर हेरगिरी करत असेल
रिलेशनशिपचा अर्थ हा नाही की तुमचे स्वातंत्र्य संपावे.
मात्र तुमचा पार्टनर तुम्हाला विचारत असेल की तुम्ही कुठे आहात तर हे स्वाभाविक आहे.
परंतु सतत प्रश्न करत असेल तर हे योग्य नाही. उदाहरणार्थ फोन चेक करणे, लोकेशन ट्रॅकर लावणे ईत्यादी.

अशा स्थितीत काय करावे?
अशा पार्टनरच्या मर्यादा ठरवा.

त्यांना स्पष्ट सांगा की हे तुमचे स्वताचे नियम आहेत ते तुम्ही तोडू शकत नाही.

काही गोष्टी जर तुम्ही त्याच्या मान्य करत नाहीत तर काही गोष्टी तुमच्या त्याला मान्य केल्या पाहिजेत.

त्याची भेट तुमच्या मित्रांशी करून द्या.

जशास तसे, म्हणजेच पार्टनर सतत प्रश्न विचारत असेल तर तुम्ही सुद्धा तसेच करून पहा. म्हणजे त्याची चूक त्याला समजेल.

Web Title :- Relationship With Partner | signs of over controlling partner in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | शिबा कुरिझ व शिबा निधी चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना उच्च न्यायालयाचा दणका ! पुणे पोलिसांनी गुंतवणूकदारांना केले ‘हे’ आवाहन

Supreme Court On DNA Test | डीएनए टेस्टसाठी सक्ती करणे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन : सुप्रीम कोर्ट

Tarak Mehta Ka Ulta Chashmah | ‘तारक मेहता’ फेम नट्टू काका यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन