Relationship | महिलांना आवडत नाहीत ‘गॉसिप’ करणारे पुरुष; ‘या’ 7 सवयी असलेल्या मुलांपासून दूर राहतात मुली; जाणून घ्या

नवी दिल्ली : Relationship | पुरुष असोत किंवा महिला त्यांना एकमेकांत काही गोष्टी पसंत येतात तर काही गोष्टी अतिशय खराब वाटतात. महिलांबाबत बोलायचे तर आपल्या पसंतीचा पुरुषाची निवड करताना त्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात. जसे की काही दिवसांपूर्वीच सुपर मॉडल ऑफ द ईयरच्या सेटवर मिलिंद सोमनसोबत बोलताना मलायका अरोराने खुलासा केला होता की, तिला क्लीन शेव आणि गॉसिप करणारे पुरुष आवडत नाहीत. पुरुषांच्या कोणत्या गोष्टी महिलांना अजिबात आवडत (Relationship) नाही, ते जाणून घेवूयात.

1. नेहमी स्वताचे कौतूक करणारे पुरुष –

महिलांना असे पुरुष अजिबात पसंत आवडत नाही जे केवळ स्वता बद्दलच बोलत (Relationship) असतात. त्यांना स्वताबद्दलच ऐकायला आवडते. त्यांना आत्ममुग्ध सुद्धा म्हटले जाऊ शकते. ते समोरच्याला बोलण्याची संधीच देत नाहीत. ज्यांना समोरच्याच्या जीवनात काय चालले आहे हे ऐकण्यात रस नसतो. प्रतिक्रियेची वाट न पाहता ते बोलत राहतात. महिलांना असे पुरुष अजिबात आवडत नाही.

2. कंट्रोल करणारे पुरुष –

असे पुरूष जे आजूबाजूच्या सर्व गोष्टी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सर्वकाही आपल्या मनाप्रमाणे हवे असते. जर तुम्ही तुमचे वेगळे मत मांडले तर ते नाराज होतात आणि तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतात की ते बरोबर आहेत आणि तुम्ही चुकीचे आहात. रिलेशनशिपमध्ये असे लोक पार्टनरला अजिबात स्पेस देत नाहीत. अशा पुरुषांपासून महिला दूर पळतात.

Aging Remedies | वाढत्या वयाची लक्षणे रोखू शकतात ‘या’ 4 गोष्टी, नेहमी राहाल ‘तरूण’; जाणून घ्या

3. नेहमी रडगाणे गाणारे पुरुष –

असे लोक ज्यांच्यासोबत असतात त्यांच्या आयुष्यातील उत्साह सुद्धा संपवतात. महिलांना अशा पुरुषांचा खुप राग येतो. अशा पुरुषांकडे नेहमीच काही ना काही रडगाणे असते. स्वभावाने हे लोक नकारात्मक आणि खुप इमोशनल असतात. ते कोणतीही गोष्ट लवकर विसरत नाहीत. रिलेशनशिपमध्ये ते नेहमी नेगेटिव्ह गोष्टींवर विचार करतात आणि पार्टनरला कमीपणा देण्याचा प्रयत्न करतात.

4. प्रत्येक गोष्टीवर ड्रामा करणारे पुरुष –

काही पुरुषांना आपल्या जवळपास गोंधळ उभा करण्याची सवय असते. एक समस्या सुटली की दुसर घेऊन येतात. त्यांना समोरच्याकडून सहानुभूती आणि मदत हवी असते. परंतु ते सल्ला ऐकत नाहीत. अशा लोकांना गोष्टी ठिक करण्याऐवजी तक्रार करत राहण्यात समाधान मिळते. रिलेशनशिपमध्ये सुद्धा ते स्वताला जास्त विशेष दाखवण्याचा प्रयत्न करतात. महिलांना असे पुरुष आवडत नाही.

5. दुसर्‍यांवर जळणारे आणि गॉसिप करणारे –

असे पुरुष तुमच्यामुळे लवकर आनंदी होत आणि दुसर्‍यांना आनंद देत नाहीत. या लोकांमध्ये जळण्याची भावना खुप जास्त होती.
हे ज्या नात्यात असतात त्यामध्ये सुद्धा विष कालवतात. ते जवळपासच्या लोकांपासून कधीही आनंदी होत नाहीत. हे लोक दुसर्‍यांना खुप लवकर जज करतात आणि आपला निर्णय सुनावतात. आपली जळजळ ते गॉसिपमधून बाहेर काढतात आणि महिला अशा पुरुषांचा द्वेष करतात.

6. खोटे बोलणारे पुरुष –

काही पुरुषांना खुप जास्त खोटे बोलण्याची सवय असते. असे पुरूष महिलांना आवडत नाहीत. महिला अशा पुरूषांसोबत जास्त काळ रिलेशनशिपमध्ये राहात नाहीत.

7. कौतुक न करणारे –

महिलांना असे पुरुष अजिबात पसंत नसतात जे कोणत्याही यशानंतर महिलांचे कौतूक करत नाहीत. त्यांना प्रोत्साहन देत नाहीत.
असे लोक पार्टनरच्या भावनांचा विचार करत नाहीत, आणि विचारांचा सन्मान करत नाहीत.
अशा लोकांवर प्रेम करणे अशक्य होऊ शकते.

हे देखील वाचा

PM Modi यांचा US दौरा ! अमेरिकेनं परत केल्या 157 कलाकृती, पीएम मोदींनी मानले आभार, प्रोटोकॉल तोडून भारतीयांना देखील भेटले

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Relationship | woman dislikes men who gossip partner toxic people things that girls hate about boys

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update