सासूने सूनेच्या Facebook पोस्टवर केली अशी कमेंट, तुटले नाते !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका महिलेने एका पोर्टलवर आपल्या सासू-सासर्‍यांचे नाराजीचे कारण सांगितले आहे. हे कारण जाणून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. महिलेने लिहिले आहे की, माझे सासू-सासरे दोघे खुप चांगले आहेत पण पण सोशल मीडियावर त्यांचे माझ्याशी वागणे खुप अजब होते.

महिलेने लिहिले की, माझे सासू-सासरे फेसबुकवर माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये होते आणि ते माझ्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करत होते. जर माझ्या मुलाचा एखादा फोटो टाकला तर ते खुप कौतूक करत होते, परंतु मी जेव्हा माझ्या मित्रांसोबतचे आपले फोटो पोस्ट करायचे तेव्हा ते मला अपमानीत करत होते.

महिलेने लिहिले, मी आता 40 वर्षांची सुद्धा नाही आणि 68 वर्षाच्या वयापर्यंत मी हवे ते परिधान करू शकते. परंतु माझे सासू-सारे नेहमी माझ्या फोटोवर वाईट कमेंट लिहित होते. माझ्या एका फोटोवर माझ्या सासर्‍याने लिहिले की, माझी अपेक्षा आहे की, तुझी मुलं तुला या आवस्थेत पहात नसतील. त्यांना सांगायचे होते की, मी त्या फोटोत नशेत होते.

महिलेने लिहिले की, एक दिवस माझ्या पोस्टवर सासू-सासर्‍यांच्या अजब कमेंटने त्रस्त होऊन मी त्यांना फेसबुकवर अनफ्रेंड केले. या कारणामुळे दोघे माझ्यावर नाराज झाले.

महिलेने लिहिले, माझ्या सासूने मला मॅसेज करून विचारले की, मी तिला अनफ्रेंड का केले. मी त्यांना फोन करून स्पष्ट सांगितले की, मला त्यांच्या कमेंटवर खुप आक्षेप आहे आणि मला माझे सोशल मीडिया अकाऊंट काही मित्रांपुरतेच मर्यादित ठेवायचे आहे. सासूने ही गोष्ट माझ्या सासर्‍यांना सांगितली आणि त्यांनतर दोघांनी माझ्याशी बोलायचे बंद केले.

महिलेने लिहिले की, माझ्या पतीने माझी बाजू घेत आपल्या आई-वडीलांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हटले की, ते त्यांना अनफ्रेंड करण्याबाबत मला काही बोलू शकत नाही. कारण सामान्यपणे माझ्या वयाच्या महिलांच्या सोशल मीडिया फ्रेंड्समध्ये त्यांचे सासू-सासरे नसतात. मी केवळ नम्रता दाखवत त्यांना अ‍ॅड केले होते.

महिलेने लिहिले, ते लोक टीनएजर्स प्रमाणे माझ्याशी वागत होते. मलाही अगोदर अनेक लोकांनी अनफ्रेंड केले आहे परंतु, मला काहीही फरक पडत नाही. या लोकांचे वागणे बालिश होते. ते आता माझ्या घरीसुद्धा येत नाहीत. माझे पती मुलांना घेऊन तिथे जातात. हे खुप हस्यास्पद आहे.

महिलेचे म्हणणे आहे की, माझे सासू-सासरे तेव्हाच नॉर्मल होतील जेव्हा मी पुन्हा त्यांना आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये सहभागी करेन, पण मी असे का करू? महिलेने लिहिले, मला वाटते 70 वर्षांच्या वयात लोकांनी आपल्या आरोग्याची चिंता केली पाहिजे, सुनेच्या सोशल मीडियाच्या पेजबाबत नाही.

माझ्या मुलाने एक दिवस मला विचारले की, त्याचे आजी-आजोबा आता माझ्याशी का बोलत नाहीत. अगोदर मी विचार केला की त्याला वेगळे काहीतरी कारण सांगावे. पण नंतर त्याला मी सांगितले की, त्याचे आजी-आजोबा यासाठी दुखी आहेत की, त्यांना आता माझ्या फेसबुक पोस्ट पहायला मिळत नाही. माझ्या 10 वर्षाच्या मुलाने म्हटले हे तर खुप अजब आहे.