वैवाहिक जीवन कसे बनवावे आनंदी ? उपयोगी पडतील ‘हे’ 5 रिलेशनशिप एक्सपर्टचे सल्ले

पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक वैवाहिक जीवनात छोट्या-मोठ्या समस्या असणे ही सामान्य बाब आहे, परंतु त्या वेळीच दूर केल्या नाहीत तर मोठ्या होऊ शकतात. बहुतांश लोक आपल्या खासगी जीवनाबाबत उघडपणे बोलणे टाळतात. या समस्या दूर करण्यासाठी रिलेशनशिप एक्सपर्टचे काही सल्ले लोकांच्या उपयोगी पडू शकतात. जाणून घेवूयात ते सल्ले कोणते…

हे लक्षात ठेवा

1 नेहमी बोलत रहा
कोणतीही समस्या दूर करण्याची पहिली पायरी चर्चा हिच असते. जर तुम्ही तुमच्या पार्टनरशी खुलेपणाने बोलला नाहीत, तर समस्या सुटणार नाही. बोलण्यानेच तुम्ही पार्टनरच्या भावना समजू शकता आणि आपल्या भावना समजावून सांगू शकता. नात्यात अडचणी तेव्हाच येतात, जेव्हा कपल्स आपसात बोलणे बंद करतात.

2 मुद्दा मोठा बनवू नका
कपल्सचा आपसातील वाद-विवाद सामान्य आहे. निरोगी नात्यासाठी हे आवश्यक सुद्धा आहे. परंतु एकाच मुद्द्यावर सतत वाद घातल्याने विषय वाढत जातो आणि नंतर नात्यात दूरावा येऊ लागतो. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दोघांचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. पार्टनरच्या विचारांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

3 मिळून करा घरातील काम
कपडे धुणे, भांडी किंवा कपाटे स्वच्छ करणे इत्यादीसारख्या कामात आपल्या पार्टनरला मदत करा. जेव्हा तुम्ही दोघे घरी असाल, तेव्हा आपआपली कामे वाटून घ्या. यामुळे एकावरच कामाचा भार येणार नाही आणि तुम्ही दोघे एकमेकांच्या आणखी जवळ येऊ शकता.

4 एकमेकांचे कौतूक करा
प्रत्येकाला अपेक्षा असता की, आपल्या पार्टनरने आपले कौतूक करावे. एकमेकांचे कौतूक केल्याने तुम्ही दोघे नेहमी पॉझिटिव्ह राहाल. यामुळे छोट्या-छोट्या अडचणींकडे दुर्लक्ष करण्याची सवयसुद्धा होईल.

5 एकमेकांना प्राधान्य द्या
पार्टनरकडून केवळ स्वत:साठी अपेक्षा करू नका, तर त्यालाही तेवढेच प्राधान्य द्या, जेवढे तुम्ही स्वत:ला देता. तुम्ही एकाच प्रकारचा विचार करण्याची गरज नाही, उलट वेगवेगळ्या विचारांचा सन्मान करणेसुद्धा आवश्यक आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like