सासवडच्या धन्वंतरी हॉस्पिटलच्या टेक्नेशियन कडून कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण

जेजुरी : (संदीप झगडे) – सासवड मध्ये धन्वंतरी हॉस्पिटलच्या टेक्नेशियनने कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, याबाबात फिर्याद सासवड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे, अजिंक्य पवार यांनी याबाबतची तक्रार दिली आहे याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अजींक्य अशोक पवार यांचा भाऊ हा १२ सप्टेंबरला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यास उपचारासाठी धन्वंतरी हॉस्पिटल सासवड येथे दाखल करण्यात आले होते.

त्याच्यावर धन्वंतरी हॉस्पिटल येथे उपचार चालू होते, उपचाराअंती २० सप्टेंबरला कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने हॉस्पिटल मधून डीचार्ज देण्यात येणार होता.२० सप्टेंबरला सांयकाळी सहा वाजलेच्या सुमारास पवार यांच्या भावाला धन्वंतरी हॉस्पिटल सासवड येथून डिस्चार्ज देण्यार होते. म्हणून पवार व त्याचा मित्र हॉस्पिटलचे बिल किती झाले आहे ते बील भरून भावास घरी नेणार होते, झालेल्या बिला बाबात माहिती घेण्यासाठी धन्वंतरी हॉस्पिटल मधील लॅब टेक्नीशियन अशोक घाडगे यांच्याकडे ते गेले असता, पवार यांनी आतापर्यंत हॉस्पिटलचे बिल किती झाले ? आमचे किती पैसे जमा आहेत ? मला झालेल्या उपचाराचे सर्व बिल द्यावे? असे प्रश्न विचारले असता अशोक घाडगे यांनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देवू लागला.

तुम्ही मला शिव्या का देत आहे असे फिर्यादीने विचारले असता,अशोक घाडगे यांनी रुमच्या बाहेर जावून, हातात एक लाकडी दांडके घेवून कारण नसताना फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारले त्यामुळे डोक्यातून रक्त येवू लागले. त्यानंतर फिर्यादीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन सासवड पोलिस स्टेशन येथे जाऊन अशोक घाडगे याचे विरूद्ध विरोधात तक्रार दाखल केली आहे.पुरंदर तालुक्यातील काही खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट होत असल्याच्या उलट-सुलट चर्चा सध्या तालुक्यात रंगताहेत.

मात्र आता अशा प्रकारे रुग्णांच्या नातेवाइकांना मारहाण करून दबाव आणण्याचे नवीनच प्रकार सुरू झाले की काय असा प्रश्न लोकांमधून उपस्थित होत आहे. पुरंदर तालुक्यात शासनाचे तीन कोरोना उपचार केंद्र आहेत.मात्र तरीही रुग्णांना लाखो रुपये खर्च करून खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे.त्यातच खाजगी रुग्णालयात अशा प्रकारचे अनेक प्रकारही घडत आहेत. हाणामारी पर्यंत गेल्याने लोकांच्या मनात रोगा पेक्षा उपचाराबाबत भीती वाढल्याचे चित्र आहे. आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहोत कोणत्याही हॉस्पिटलच्या बिलाबाबत तक्रारी असतील तर थेट प्रशासनाशी संपर्क साधा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like