जनसेवा, वय लक्षात घेऊन डॅडींची शिक्षा माफ करा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – अखिल भारतीय सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरूण गवळी यांची उर्वरीत शिक्षा माप करावी अशी मागणी अखिल भारतीय सेनेने केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. अरूण गवळी यांची जनसेवा आणि वय लक्षात घेऊन त्यांची उर्वरीत शिक्षा माफ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

१९६६ मध्ये अरूण गवळी यांनी अखिल भारतीय सेनेची स्थापना केली. सेनेच्या माध्यमातून त्यांनी जनसेवकाच्या रुपामध्ये काम सुरू केले. त्यात लाखो गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला. राज्यातील अनेक गोशाळांना चारा पुरवला, गोरगरीबांच्या पन्नास वर्षांपासूनच्या समस्या त्यांनी सोडवल्या. यामुळे त्यांची उर्वरीत शिक्षा माफ करावी, असं निवदेन अखिल भारतीय सेनेनं जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिलं आहे.

दरम्यान, अरुण गवळी सध्या नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये जेलमध्ये महात्मा गांधींजींच्या विचारांवर परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी अरूण गवळींनी ८० पैकी ७४ गुण मिळवले होते. त्यात त्यांचा प्रथम क्रमांक आला होता. त्यामुळे आता जिल्हाधिकारी अखिल भारतीय सेनेचे हे निवेदन कशा पद्धतीन हाताळतील हे पाहणं महत्त्वाचं आहे.