शाहरुखच्या झिरो चा टिझर रिलीज

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

शाहरुख खानच्या आगामी ‘झिरो ‘ या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. शाहरुख खानने सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून हा टिझर रिलीज केला . या टीझरचे विशेष म्हणजे यात बॉलिवूडचे करण-अर्जुन एकत्र नाचताना दिसत आहेत. यात सलमानने चक्क शाहरुख खान ला कवेत उचलून घेतले आहे.

शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्यांची भूमिका करताना दिसणार आहे. येत्या डिसेम्बर महिन्यात हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान सोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहेत.

असा आहे टिझर

सिनेमाच्या टीझरची सुरुवात प्रशिद्ध शायर मजरुह सुलतानपुरी यांच्या शेरने होते. “मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया. यानंतर कतरिना कैफचा फोटो असलेला टी शर्ट परिधान केलेल्या शाहरुख खानची एण्ट्री होते. शाहरुख खानच्या व्यक्तिरेखेचं नाव बऊआ स‍िंह आहे. बॅकग्राऊंडमध्ये जावेद जाफरीचा आवाज आहे. मग सलमान खानची एण्ट्री होते आणि सलमान चित्रपटाचा पहिला डायलॉग बोलतो, ‘सुना है जिसके पीछे लग जाते हो लाईफ बना देते हो.’टीझरमध्ये सलमान खान-शाहरुख खान गळ्यात लाल गमछा घालून देसी अंदाजात थिरकतात. आनंद एल रॉय हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 21 डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.