मुकेश अंबानी यांनी केली मोठी घोषणा ! Jio आणि Google बनवणार ‘स्वस्त’ अँड्रॉईड स्मार्टफोन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड (आरआयएल) च्या 43व्या एजीएममध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजच्या चेयरमनने 2जी मुक्तची घोषणा केली आहे. याअंतर्गत जिओ, गुगलसोबत स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच करणार आहे. तसेच देशातील सर्व 2जी फिचर फोन यूजर्सला स्मार्टफोनवर आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. नुकतीच गुगलने भारतात डिजिटल इंडियासाठी 75,000 कोटी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

एजीएममध्ये अंबानी यांनी म्हटले की, कंपनीने 5जी नेटवर्क तयार केले आहे, जे जगातील सर्वात बेस्ट 5जी नेटवर्क आहे. जिओचा दावा आहे की, त्यांच्या 5 जी नेटवर्कमध्ये पूर्णपणे स्वदेशी उपकरणांचा वापर केला आहे. यासाठी 20 पेक्षा जास्त स्टार्टअप्सची मदत घेतली गेली आहे. अंबानी म्हणाले, गुगलने जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, ज्या बदल्यात त्यांची 7.7 टक्के भागीदारी असेल.

रिलायन्स एजीएममध्ये जिओ ग्लासची सुद्धा घोषणा करण्यात आली, जी एक मिक्स्ड रिअलिटी ग्लास आहे. जिओ ग्लास एक स्मार्ट ग्लास आहे, ज्यामध्ये इंटरनेट, स्पीकर आणि माईक दोन्हीचा सपोर्ट दिला आहे. जिओ ग्लासद्वारे तुम्ही कॉलिंगसुद्धा करू शकता.