… म्हणून आलीयं उद्योगपती अनिल अंबानींवर मुंबईतील हेडक्‍वार्टर विकण्याची वेळ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी कर्ज फेडण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. आता ते कर्ज फेडण्यासाठी मुंबईत असलेले त्यांचे मुख्यालय विकण्याच्या तयारीत आहेत. यासाठी अनिल अंबानी ब्लॅकस्टोन व काही ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी फर्मो सोबत चर्चा करत आहेत.

अनिल अंबानी मुंबईतील सांताक्रुज येथील रिलायन्स सेंटरचे मुख्यालय विकणार आहेत किंवा अधिक वेळ मुख्यालय गहाण ठेवून कर्ज फेडण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स सेंटर नावाचे हे मुख्यालय ७ लाख स्क्वेअर फुटाचे आहे. याची विक्री केल्यानंतर १,५०० ते २००० कोटी रुपये मिळू शकतात. या मुख्यालयावर कायदेशीर वाद आहे. त्यामुळे या मार्गाने पैसे जमविणे वाटते तितके सोप्पे नाही.

अनिल अंबानी कर्ज संकटात

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर १ लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. मार्च २०१८ आकडेवारीनुसार रिलायन्स ग्रुपवर ४६ हजार ४०० कोटी रुपयाचे कर्ज आहे. रिलायन्स कम्युनिकेशवर ४७ हजार २३४ कोटीचे कर्ज आहे. रिलायन्स होम फायनान्स आणि इन्फ्राचे एकूण कर्ज ३६ हजार कोटी रुपये आहे. रिलायन्स पॉवरवर ३१ हजार कोटी रुपयाचे कर्ज आहे. अनिल अंबानी बिलेनियर क्लबमधून देखील बाहेर पडले आहेत.

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

‘या’ घरगुती उपयांनी करा चेहरा मॉइश्चरायईज

‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे

नोकरी शिक्षणानंतर आता स्थानिक निवडणुकांत मराठा आरक्षण ?

 

You might also like