रिलायन्स आणि बीपीच्या पेट्रोल पंपवर मिळणार ‘इलेक्ट्रिक’ वाहने ‘चार्ज’ करण्याची खास सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेटने BP पीएलसीबरोबर मिळून देशभरातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी योजना तयार केली आहे. या योजने अंतर्गत रिलायन्स आणि BP पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिल वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट लावू शकतात. RIL ने ब्रिटनच्या पेट्रोलियम कंपनी BP पीएलसी बरोबर जाॅइंट वेंचरची घोषणा केली आहे. या वेंचर अतंर्गत देशभरात 5,500 पेट्रोल पंप सुरु करण्यात येतील.

मिळेल ही सुविधा –
रिलायन्स – BP च्या पेट्रोल पंपवर पेट्रोल, डिझेलसह सीएनजी, एलएनजी आणि इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगची सुविधा देण्यात येईल. कंपनीचा प्रयत्न आहे की ही सुविधा लोकांना जवळच्या जवळच उपलब्ध होईल.

7000 पेक्षा अधिक चार्जिंग पॉईंट –
BP ब्रिटनने सर्वात मोठी EV चार्जिंग कंपनी चार्जमास्टरला आपल्यात सामावून घेतला आहे आणि आता त्याचे नाव BP Chargemaster आहे. या  कंपनीचे सर्वात अधिक 7,000 पेक्षा जास्त सार्वजनिक चार्जिंग पॉईंट आहेत. ज्या अखत्यारित लोकांना वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.

RIL ला या ब्रिटीश BP कंपनीच्या अनुभवाचा फायदा मिळेल. RIL आणि  BP ने 6 ऑगस्टला भारतात आपल्या इंधन विक्री पार्टनरशिपची घोषणा केली आहे. या भागीदारीत RIL ने 51 टक्के आणि BP चा 49 टक्के हिस्सा असणार आहे. आता या भागीदारीतून संपूर्ण भारतात 5,500 पेट्रोल पंप सुरु करण्याची योजना आहे.

आरोग्यविषयक वृत्त –