Facebook आणि Reliance मिळून तयार करू शकतात हे Super App, असणार ‘खास’ गोष्टी

पोलीसनामा ऑनलाईन :    मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अमेरिकन टेक कंपनी फेसबुक मिळून एक नवीन अ‍ॅप लाँच करण्याची शक्यता आहे. अहवालानुसार फेसबुक आणि रिलायन्स असे अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे अनेक कामे होऊ शकतात. चिनी अ‍ॅप WeChatच्या धर्तीवर याला तयार केले जाऊ शकते. हा अ‍ॅप मेसेजिंगसह अनेक सेवा प्रदान करतो. अहवालानुसार फेसबुक आणि रिलायन्सच्या अ‍ॅपमध्ये मेसेज करण्याव्यतिरिक्त किराणा खरेदी, रिचार्ज आणि पेमेंट यासारख्या सेवा देता येतील. या सुपर अ‍ॅपमध्ये गेमिंग, हॉटेल बुकिंग आणि सोशल मीडिया उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकचे भारतात मोठे युजरबेस असून या अ‍ॅपचादेखील फायदा होऊ शकतो.

रिलायन्सबद्दल बोलायचे झाले तर भारतात रिलायन्स जिओचे बरेच वापरकर्ते आहेत आणि यातील बरेचसे वापरकर्ते जिओचे अ‍ॅप्स वापरतात. रिलायन्सचे वेगवेगळे नेटवर्क आहेत – जसे रिलायन्स रिटेल स्टोअर्स, ई-कॉमर्स, फिल्म अ‍ॅप्स आणि पेमेंट अ‍ॅप्स. जर फेसबुक आणि रिलायन्सचे हे सुपर अ‍ॅप बनले तर रिलायन्स स्वत: ची वेगळी सेवा जोडेल. फेसबुकविषयी बोलल्यास दोन्ही कंपन्यांना फेसबुकच्या रीचचा फायदा होईल. फेसबुक तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया इन्स्टंट मेसेजिंग फ्रंटवर या अ‍ॅपमधील वापरकर्त्यांना सुविधा देईल. चीनमधील वेचॅट हे असेच अ‍ॅप आहे, जिथून पेमेंटवर मेसेजिंग व शॉपिंग केली जाते.

माहितीनुसार, या टीममधील एका व्यक्तीने म्हटले आहे की, एक नवीन कंपनी तयार केली जाऊ शकते जिथे दोन्ही कंपन्या गुंतवणूक करतील किंवा फेसबुक रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करू शकेल. दोघांच्या सहभागाने एक नवीन उपक्रम सुरू करता येईल. अलीकडेच असे वृत्त देण्यात आले आहे की, अमेरिकन सोशल मीडिया कंपनी फेसबुक जियोमध्ये 10% पर्यंत गुंतवणूक करणार आहे. दरम्यान, आतापर्यंत या दोन्हीपैकी कोणत्याही कंपनीने याबाबत अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.