रिलायन्स इंडस्ट्रीजने बंद केले जामनगरचे युनिट, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Reliance Industries Limited | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) ने गुजरातच्या जामनगरमध्ये आपल्या रिफायनरीचे एक युनिट बंद केले आहे. ही माहिती स्वता कंपनीने शेयर बाजाराला दिली.

काय सांगितले कारण :
रिलायन्सनुसार कंपनीला जामनगरमध्ये आपल्या एसईझेड रिफायनरीमध्ये फ्लूईडाईज्ड कॅटेलिटिक क्रॅकर युनिट (एफसीसीयू) इमर्जन्सी स्थितीमध्ये बंद करावे लागले. कंपनीने म्हटले एफसीसीयू युनिटची प्राधान्याने दुरूस्ती केली जात आहे आणि ती लवकरच सुरू होण्याची आशा आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले, जामनगरमध्ये उर्वरित सर्व रिफायनरीमध्ये सामान्यपणे काम सुरू आहे. मात्र, काही उत्पादनांच्या शिपमेंटमध्ये उशीर होऊ शकतो. परंतु आम्ही ग्राहकांवर याचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करत आहोत. रिलायन्सच्या जामनगरमध्ये दोन रिफायनरी आहेत, ज्या कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल सारखे इंधन तयार करतात.

कोरोना काळात ऑक्सीजनचे प्रॉडक्शन :
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सीजनचे मोठे संकट निर्माण झाले होते. या स्थितीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज फ्री मध्ये ऑक्सजीन पुरवण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या जामनगर रिफायनरीमध्ये रोज 700 टनपेक्षा जास्त वैद्यकीय ऑक्सीजनचे उत्पादन केले. जामनगर रिफायनरीत वैद्यकीय ऑक्सजीनचे उत्पादन होत नाही.

हे देखील वाचा

‘महाविकास’मध्ये ‘तणाव’; राष्ट्रवादीचं मिशन 2024 तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Burglary in Pune | आंबेगाव पठार परिसरात भरदिवसा घरफोडी; 10 लाखाचा ऐवज लंपास

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात एकाचा मृत्यू

धक्कादायक ! झोपेत असलेल्या मुलीची आईनेच केली हत्या; सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Reliance Industries Limited | mukesh ambani led reliance shuts down a unit of jamnagar oil refinery know detail