रिलायन्स इंडस्ट्रीजनं बनवलं आणखी एक रेकॉर्ड, बनली जगातील दुसरी सर्वात मोठी एनर्जी कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. शुक्रवारी आरआयएल जगातील दुसरी सर्वात मोठी व्हॅल्यूएबल कंपनी बनली आहे. आतापर्यंत एक्सॉन मोबाईल जगातील दुसरी मोठी व्हॅल्यूएबल एनर्जी कंपनी होती. शुक्रवारी आरआयएलचे मार्केट कॅपिटलायजेशन 14 लाख कोटीच्या विक्रमी स्तरावर पोहचले. शुक्रवारी (24 जुलै) आरआयएलच्या शेयरमध्ये शानदार तेजी आली. शेयरचा भाव 4.40 टक्के वाढून 2,148.40 रुपयांवर बंद झाला.

सौदी अरामको जगातील सर्वात बहुमूल्य एनर्जी कंपनी
सौदी अरामको जगातील सर्वात बहुमूल्य एनर्जी कंपनी आहे. यानंतर आरआयएलचा नंबर आहे. बाजार भांडवलात आरआयएलने शेवरॉन, ऑरेकल, बँक ऑफ चायना, बीएचपी ग्रुप, रॉयल डच शेल आणि सॉफ्ट बँकेला मागे टाकले आहे. रिलायन्स बाजार भांडवलात आशियातील 10वी सर्वात मोठी कंपनी आहे. चीनचा अलीबाबा ग्रुप जगात 7 व्या स्थानावर आहे.

जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती
सौदी अरबची ऑईल कंपनी सौदी अरामको जगातील सर्वात व्हॅल्यूएबल कंपनी सुद्धा आहे. तिचे मार्केट कॅपिटलायजेशन 1.75 लाख कोटी डॉलर (131.25 लाख कोटी रुपये) आहे. अ‍ॅप्पल दूसर्‍या स्थानावर आहे आणि तिचे बाजार भांडवल 1.6 लाख डॉलर (120 लाख कोटी रुपये) आहे. 1.5 लाख कोटी डॉलर (112.5 लाख कोटी रुपये)सह मायक्रोसॉफ्ट तिसर्‍या स्थानावर आहे. अमेझॉनचे मार्केट कॅप 1.48 लाख कोटी डॉलर (111 लाख कोटी रुपये) आहे. गुगलचे मार्केट कॅप 1.03 लाख कोटी डॉलर (77 लाख कोटी रुपये) आहे.

जगातील 46वी सर्वात मोठी कंपनी बनली आरआयएल
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मार्केट कॅपिटलायजेशनच्या आधारावर आरआयएल जगातील 46वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. गुरुवारी ही एक्सॉन मोबाईलच्या मागे 48व्या स्थानावर होती. परंतु, शुक्रवारी शेयरच्या किंमतीत तेजी आल्याने ती एक्सॉनला मागे टाकत 46व्या स्थानावर आली.

कर्जमुक्त झाल्याने आरआयएलच्या शेयरमध्ये तेजी
मार्चमध्ये शेयर बाजारात मोठी घसरण झाली होती. यामुळे रिलायन्सचे शेयर 23 मार्च ला 867 रुपयांवर आले होते. तेव्हा कंपनीचे बाजार भांडवल 5.5 लाख कोटी रूपये होते. तेव्हापासून कंपनीच्या शेयरमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. त्याचे कारण हे आहे की, कंपनीने स्वत:ला कर्जमुक्त करण्याचे लक्ष्य वेळेच्या आधी पूर्ण केले आहे. यासाठी कंपनीने राईट्स इश्यू आणि जियो प्लॅटफॉर्ममधील भागीदारी विकून 2,12,809 कोटी रुपये जमवले.