RIL AGM : Jio-Google ने मिळवला हात, भारताला करणार 2G मुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   Reliance Industries Ltd (RIL) च्या Annual general meeting (AGM) मध्ये कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी बुधवारी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की, पुढील वर्षापर्यंत 5जी तंत्रज्ञान लाँच केले जाऊ शकते. गुगल आणि जिओ मिळून एक ऑपरेटिंग सिस्टम वतील, जी एंट्री लेव्हल 4जी/5जी स्मार्टफोनसाठी असेल. जिओ आणि गुगल मिळून भारताला 2जी-मुक्त बनवू. तसेच सर्च इंजिन कंपनी गुगलने जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये 33,737 कोटी रूपये गुंतवणूक केली आहे.

– मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी प्रथमच रिलायन्स एजीएमला संबोधित केले. त्यांनी रिलायन्स फाऊंडेशनद्वारे कोरोना संकटात करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. रिलायन्स फाऊंडेशनच्या चेयरपर्सन नीता अंबानी यांनी सांगितले की, मिशन अन्नसेवाद्वारे देशभरात 5 कोटीपेक्षा गरीब, मजूर आणि फ्रंटलाइन वर्कर्ससाठी भोजन उपलब्ध केले गेले.

– मुकेश अंबानी म्हणाले, आपल्याकडे रिलायन्सला जगातील प्रमुख न्यू एनर्जी आणि न्यू मॅटेरियल कंपनीपैकी एक बनवण्यासाठी 15 वर्षांचे व्हिजन आहे. न्यू एनर्जी व्यवसाय भारत आणि जगासाठी एक मल्टी ट्रिलियन डॉलरची संधी आहे.

– मुकेश अंबानी यांनी म्हटले की, मार्केट कॅपिटलायजेशनद्वारे रिलायन्स आता जागातील 60 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आणि रिलायन्स अजूनही यशाचा उच्चस्तर प्राप्त करत आहे, आपले कर्मचारी आणि शेयरधारक निश्चितपणे याचा पुरस्कार प्राप्त करतील.

– नीता यांनी म्हटले की, कोरोना संक्रमण सुरू होताच पीपीई किटचे मोठे संकट निर्माण झाले होते. यासाठी विक्रमी वेळात अशी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी बनवण्यात आली, ज्याद्वारे दररोज 1 लाख पीपीई किट आणि एन95 मास्क बनवता येतील. रिलायन्स इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये लागणार्‍या गाड्यांसाठी देशभरात मोफत इंधन उपलब्ध करून देत आहे.

– मुकेश अंबानी यांनी ऊर्जा क्षेत्रात कंपनीला असलेल्या संधीची देखील माहिती दिली. बीपीने रिलायन्सच्या फ्यूल रिटेलिंग बिजनेसमध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक जिओ-बीपी नावाच्या ब्रँडमध्ये होणार आहे. मुकेश अंबानी यांनी क्लीन एनर्जी क्षेत्रात करण्यात येत असलेल्या कामाबाबत सुद्धा माहिती दिली. ते म्हणाले, रिलायन्स कार्बन डाय ऑक्साईडला उपयोगी प्रॉडक्ट आणि केमिकल्समध्ये बदलण्याचे काम करणार्‍या नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासाठी प्रतिबद्ध आहे.

– जिओ मार्टची माहिती देताना मुकेश अंबानी म्हणाले, याच्या पायलट मॉडलची यशस्वी सुरूवात झाली आहे. या ग्रोसरी प्लॅटफॉर्मच्या बीटा वर्जनची सुरूवात 200 शहरांमध्ये झाली आहे. डेली ऑर्डरचा आकडा अडीच लाखांच्या पुढे गेला आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

– रिलायन्स रिटेलची माहिती देताना मुकेश अंबानी म्हणाले, ग्रोसरी बिजनेस वाढवण्याची मुख्य रणनिती शेतकर्‍यांना जोडणे आणि फ्रेश प्रॉडक्ट्स घरापर्यंत पोहचवणे आहे. यातून शेतकर्‍यांचे उत्पन्न चांगले होईल तसेच उत्पादनातही वाढ होईल.

– मुकेश अंबानी म्हणाले, भारत 5जी युगाच्या दरवाजावर उभा आहे. आपला प्रयत्न आहे की, सध्या 2जी फोन वापरणार्‍या 35 कोटी भारतीयांना स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करून देणे हा आहे. एजीएममध्ये फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे व्हिडिओ संदेश दाखवण्यात आले.

– मुकेश अंबानी म्हणाले, जिओ मार्टला व्हॉट्सअपच्या तंत्रज्ञानासोबत सादर करण्यात येईल. या आघाडीमुळे भारतातील लाखो छोट्या दुकानदारांचे व्यवसाय जोडले जातील. ग्राहकांनासुद्धा किराणा स्टोअरमधून सामान खरेदी करण्यास मदत होईल.

– जिओ मार्ट सादर करताना ईशा अंबानी यांनी सांगितले की, या तंत्रज्ञाने सध्याची किराणा दुकाने 48 तासांच्या आत सेल्फ स्टोअरमध्ये बदलली जातील. यामुळे कस्टमर एक्सपिरियन्स सुद्धा पूर्णपणे बदलला जाईल. जिओ मार्टमुळे किराणा स्टोअर्सचा बिजनेस वाढेल तसेच कमाईसुद्धा होईल. जिओ मीटबाबत ईशा अंबानी यांनी सांगितले की, हे एक स्वस्त आणि खुप सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप आहे.

– ईशा आणि आकाश अंबानी यांनी नव्या जिओ टीव्ही प्लसचे डेमॉन्स्ट्रेशन दिले. जिओ टीव्ही प्लस नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मला एका अ‍ॅपवर आणले जाईल. याशिवाय, हे व्हॉईस सर्चने सुद्धा युक्त असेल.

– जिओने जिओ ग्लाससुद्धा यावेळी सादर केली. अवघे 75 ग्रॅम वजन असलेल्या या डिव्हाईसमध्ये मिक्स रियल्टीशी संबंधित सर्व्हिसेस असतील. हे सिंगल केबलने कनेक्ट होईल. यामध्ये 25 अ‍ॅप्स असतील, जे एआर तंत्रज्ञानाच्या व्हिडिओ मीटिंगमध्ये उपयोगी येईल.

-रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानी म्हणाले, जिओ येत्या तीन वर्षात अर्धा अरब मोबाईल कस्टमर जोडेल. जिओने संपूर्ण 5जी तंत्रज्ञान विकसित केले आहे. 5जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच यासाठी ट्रायल सुरू होईल. फिल्डमध्ये वापरासाठी पुढील वर्षापर्यंत हे तंत्रज्ञान तयार असेल.

– अंबानी म्हणाले, रिलायन्स आता खरोखर कर्जमुक्त कंपनी झाली आहे. अंबानी यांच्यानुसार, हे लक्ष्य मार्च 2021 च्या डेडलाइनपूर्वी मिळवले जाईल. कंपनीची मजबूत बॅलन्स शीट जिओ, रिटेल आणि ओटूसीसाठी ग्रोथ प्लानमध्ये मदत करेल.

– अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलच्या भागीदारीची सुद्धा माहिती दिली. गुगल जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 33,737 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.

-मुकेश अंबानी म्हणाले, रिलायन्स 150 बिलियन डॉलर मार्केट कॅपवाली पहिली भारतीय कंपनी बनली आहे. अंबानी यांनी विश्वास व्यक्त केला की, कोरोना संकटात भारत आणि जग वेगाने प्रगती करेल. प्रत्येक समस्या आपल्या सोबत काही शक्यता सुद्धा आणते.

आरआयएलच्या इतिहासात प्रथमच असे झाले की, लोक या इव्हेंटमध्ये ऑनलाईन सहभागी झाले. शेयरहोल्डर्स जिओ मीट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपद्वारे सहभागी झाले होते. तत्पूर्वी रिलायन्सची वार्षिक एजीएम खुप धुमधडाक्यात आयोजित केली जात असे, आणि मोठ्याप्रमाणात यामध्ये लोक सहभागी होत असत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like