Reliance Jio च्या ‘या’ 3 प्लानमध्ये रोज मिळतो 3 GB डेटा अन् 84 दिवसांची वैधता

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी रोज 3 जीबी डेटा मिळणाऱ्या 3 प्लान्सची (3gb Per Day Data Plan) खास माहिती देत आहोत. या प्लानची किंमत वेगवेगळी असली तरी या प्लानमध्ये रोज 3 जीबी डेटा यूजर्संना मिळतो, तर जाणून घेऊया कोणती आहेत ते 3 प्लान.

1) 349 रुपयांचा प्लान
या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. यात रोज 3 जीबी डेटा म्हणजेच 84 जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. तसेच अन्य दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार मिनीट मिळतात. या प्लानमध्ये रोज 100 मेसेज पाठवण्याची सुविधा मिळणार आहे.

2) 401 रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये यूजर्संना डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. परंतु, यात रोज 3 जीबी डेटा शिवाय 6 जीबी एक्स्ट्रा म्हणजेच एकूण 90 जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये रोज 100 मेसेज आणि दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार मिनिट्स मिळतात. तसेच वर्षभरासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते.

3) 999 रुपयांचा प्लान
जिओचा हा 3 जीबी डेटा मिळणार हा तिसरा प्लान आहे. या प्लानमध्ये रोज 3 जीबी डेटा म्हणजेच एकूण 252 जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लानमध्ये अन्य दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3 हजार मिनिट्स आणि रोज 100 मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते.