50 रुपयांनी स्वस्त Reliance Jio प्लॅन; जाणून घ्या काय आहेत फायदे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या देशभरात कार्यरत आहेत. Airtel, Vi, BSNL आणि Reliance Jio या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विविध प्लॅन्स आणत आहेत. त्यानंतर आता Reliance Jio चा प्लॅन 50 रुपयांनी स्वस्त आहे. Reliance Jio चा 149 रूपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. तर दिवसाला 1 GB डेटा देणाऱ्या प्लॅन्समध्ये एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडे 199 रूपयांचा प्लॅन आहे. म्हणजे इतर कंपन्यांच्या तुलनेत 50 रूपयांनी स्वस्त आहे.

काय आहे या प्लॅनमध्ये ?

24 दिवसांची वैधता. 1 GB डेटा प्रतिदिन.

कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग

100 SMS दररोज जिओ ॲप्सचाही लाभ

– Airtel चा रिचार्ज प्लॅन जिओच्या तुलनेत महाग आहे. याचे दर 199 रूपये इतके आहे. या प्लॅनची वैधता 24 दिवसांची असून, यात ग्राहकांना दररोज 1 GB याप्रमाणे 24 GB डेटा मिळतो.

– Vi चाही प्लॅन Reliance Jio च्या प्लॅनपेक्षा थोडा महाग आहे. 199 रूपयांच्या या प्लॅनची वैधता 24 दिवसांची. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1 GB याप्रमाणे 24 GB डेटा देण्यात येतो. तसेच यात अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ देण्यात येतो.