मोबाईल ‘टेरिफ’मध्ये होऊ शकते इतकी वाढ, AGR वर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा ‘परिणाम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅडजस्डेट ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशातील टेलिकॉम सेक्टरमध्ये बरेच बदल झाले. या आदेशानंतर वोडाफोन आयडियाच्या भविष्याबद्दल भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. बाजार जाणकारांच्या मते, न्यायालयाच्या या निर्णयानंतर दूरसंचार कंपन्या आपल्या टॅरिफमध्ये मोठी वाढ करु शकतात. एजीआर बद्दल सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2019 मध्ये निर्णय सुनावला होता. यानंतर कंपन्यांनी आपल्या टॅरिफमध्ये वाढ केली आहे.

24 ऑक्टोबर 2019 साली एजीआरवर न्यायालयाने निर्णय दिला होता. या निर्णयात टेलिकॉम कंपन्यांना एजीआर भरण्यास सांगितले होते. एजीआरच्या रुपात टेलिकॉम कंपन्यांनी सरकारला 1. 47 लाख कोटी रुपये द्यायचे आहेत. वोडाफोन आयडिया लिमिटेडने सरकारला 53,038 कोटी रुपये द्यायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एजीआर देण्यास होत असलेल्या विलंबानंतर शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. एअरटेलवर 35.856 कोटी रुपयांची देणेदारी आहे. दूरसंचार कंपन्यांना एजीआर भरण्यासाठी शुक्रवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली होती.

मोबाइल टॅरिफमध्ये 10 – 25 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता –
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता वोडाफोन आयडियाला भारतात टेलिकॉम व्यवसायात टिकून राहणे अवघड झाले आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते येत्या काळात भारतात फक्त दोनच टेलिकॉम कंपन्यांचा दबदबा असेल, अशा परिस्थिती टॅरिफ आणखी वाढू शकतो. त्यामुळे येत्या काळात टॅरिफ 10 – 25 टक्के वाढवला जाऊ शकतो. यानुसार येत्या काही दिवसात तुमच्या खिशाचा भार वाढू शकतो.