खुशखबर ! ४९९ च्या रिचार्जवर Jio आणि Airtel २५० रूपयाचं ‘डिस्काऊंट’ कापून देण्याची तयारीत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपन्या ‘भारती एअरटेल’ आणि ‘रिलायंस जिओ’ यांनी ग्राहकांना विविध वस्तू उपलब्ध करुन देणारी कंपनी ‘हिंदुस्तान युनिलीवर’ बरोबर करार करण्याच्या तयारीत आहे. जर हा करार झाला तर जिओ आणि एअरटेलकडून आपल्या ग्राहकांवर रिचार्ज प्लॅनवर डिस्काऊंट देण्यात येईल.

४९९ च्या रिचार्ज वर २५० रुपयांचा डिस्काऊंट

कंपनीकडून ४९९ रुपयांपेक्षा आधिकच्या रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना २५० रुपये डिस्काऊंट वाऊचर देण्यात येईल. या वाऊचरचा वापर ग्राहक किराणा दुकानात करु शकतात. यातून ग्राहक ‘हिंदुस्तान युनिलीवर’च्या वस्तू विकत घेऊ शकतात.

हिंदुस्तान युनिलीवरला होणार फायदा

डिल फायनल झाल्यावर दोन टेलिकाॅम कंपन्यांना कमाईचा नवा मार्ग मिळेल. दोन्ही टेलिकॉम कंपन्या सध्या ग्राहकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. करारसाठी दोन्ही कंपन्या एचयूएल बरोबर चर्चा करत आहे. या करारात एचयूएलला देखील फायदा होणार आहे. ज्यातून ‘क्लाऊड बेस्ड अ‍ॅनालिटिक्स’ करुन ग्राहकांचे खरेदी वर्तन जाणून घेतील.

किराणा मालाच्या दुकानावर पीओएस

एअरटेल आतापर्यंत ग्राहकांना कायम बनवण्यासाठी आणि ARPU वाढवण्यासाठी एंटरटेनमेंट आणि स्पोर्ट्स कंटेंटवर फोकस करत होते. मात्र आता त्यात नवे पाऊल टाकत ‘कंज्युमर गुड्स सेगमेंट’ देण्यासाठी आणि किराणा दुकानांबरोबर करार करण्याच्या निर्णय घेतला आहे. यात मुकेश अंबानींच्या जिओला टक्कर देण्यासाठी देखील मदत मिळेल. जिओ सध्या आपल्या ‘पीओएस टर्मिनल’ आणि ‘पीओएस सिस्टीम’च्या माध्यमातून किराणा मालाच्या दुकानदारांबरोबर टायअप करत आहेत.

Loading...
You might also like