‘हे’ आहेत Jio चे 200 रूपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे बेस्ट ‘कॉम्बो’ प्लॅन्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम क्षेत्रात ‘जिओ’ आपल्या सुरुवातीपासूनच भारतात वेगाने वाढत आहे. ट्रायने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये जिओने आपल्या नेटवर्कमध्ये ४६ लाखाहून अधिक युजर्सना जोडले आहेत. यावरून हे समजू शकते कि मोठ्या संख्येने लोक जिओला पसंती देत आहेत.

येथे आपण २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे जिओचे बेस्ट कॉम्बो प्लॅन्स जाणून घेणार आहोत. या प्लॅन्सची किंमत ९८ रुपयेपासून आहे.

९८ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये कंपनी २८ दिवसांच्या वैधतेसह २ जीबी डेटा देते. या पॅकमध्ये विनामूल्य ऑन-नेट कॉलिंग उपलब्ध आहे आणि ऑफ-नेट कॉलिंगसाठी प्रति मिनिट ६ पैसे शुल्क आकारले जाते. यात ३०० एसएमएस आणि जिओ ऍप्सवर विनामूल्य ऍक्सेस दिला जातो.

१२९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये कंपनी २ जीबी डेटा, फ्री ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी १००० मिनिटे, ३०० एसएमएस आणि जिओ ऍप्सचे विनामूल्य सदस्यत्व देते. याची वैधता २८ दिवस आहे.

१४९ रुपयांचा प्लॅन
कंपनीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा दिला जातो. तसेच यात विनामूल्य ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी ३०० मिनिटे, दररोज १०० एसएमएस आणि जिओ ऍप्सचे विनामूल्य सदस्यत्व देखील दिले जाते. याची वैधता २४ दिवस आहे.

१९९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये कंपनी दररोज १.५ जीबी डेटा देते. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये ऑन-नेट कॉलिंग विनामूल्य मिळते आणि ऑफ-नेट कॉलिंगसाठी १००० मिनिटे दिली जातात. तसेच दररोज १०० एसएमएस आणि जिओ ऍप्सवर विनामूल्य ऍक्सेस दिला जातो.