Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी अनेक जबरदस्त पोस्टपेड प्लान ऑफर केले आहे. यात युजर्सना 200 जीबी पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक अतिरिक्त बेनिफिट मिळणार आहेत. या प्लान्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडिओचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले आहे. जाणून घ्या कोणते आहेत हे प्लान.

599 रुपयांचा पोस्टपेड प्लान
599 रुपयांच्या महिभराच्या या प्लानमध्ये जिओ कंपनी अनलिमिटेड कॉलिंग अन् 100 फ्री एसएमएस देत आहे. इंटरनेट युसेजसाठी या प्लानमध्ये एकूण 100 जीबी डेटा दिला आहे. प्लानमध्ये 200 जीबी डेटा रोलओवर बेनिफिट सोबत येतो. प्लानमध्ये मिळणारे अतिरिक्त बेनिफिट्स मध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

799 रुपयांचा प्लान
799 रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी एकूण 150 जीबी डेटा ऑफर करीत आहे. हा प्लान 200 जीबी डेटा रोलओवर बेनिफिट ऑफर करतो. प्लानच्या सब्सक्रायबर देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 फ्री एसएमएस पाठता येणार आहे. प्लानमध्ये जिओ ॲप्सचे फ्री ॲक्सेस सोबत नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.

999 रुपयांचा प्लान
999 च्या या प्लानमध्ये कंपनी 500 जीबी डेटा रोलओवर बेनिफिट सोबत एकूण 200 जीबी डेटा देत आहे. या फॅमिली प्लानमध्ये 3 अतिरिक्त सिम कार्डचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज 100 फ्री एसएमएस सोबत अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट दिला जातो. बाकीच्या प्लान्सप्रमाणे नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.