Reliance Jio-BP ने सुरू केले पहिले मोबिलिटी स्टेशन, पेट्रोल-डिझेल आणि ईव्ही चार्जिंगसह मिळतील अनेक सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Reliance Jio-BP | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी बीपी (BP) ने एकत्रितपणे पहिले मोबिलिटी स्टेशन सुरू (Reliance Jio-BP) केले आहे. दोन्ही कंपन्यांनी मंगळवारी संयुक्त वक्तव्यात सांगितले की, या मोबिलिटी स्टेशनवर ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसह अनेक प्रकारचे इंधन पर्याय उपलब्ध असतील.

फ्यूएल अँड मोबिलिटी जॉईंट व्हेन्चर रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (RBML) चा हा पेट्रोल पंप नवी मुंबईतील (Navi Mumbai) नावडे येथे सुरू केला आहे.

 

रिलायन्सच्या 1400 पेट्रोल पंपाचे होईल Rebranding
रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडने म्हटले की, कोरोना व्हायरस महामारीने प्रभावित आव्हानात्मक वातावरणात जियो-बीपी (Jio-BP) जागतिक स्तरावरील मोबिलिटी स्टेशनचे नेटवर्क (Reliance Jio-BP) सुरू करत आहे.

 

बीपीने 2019 मध्ये रिलायन्सच्या मालकीचे 1,400 पेक्षा जास्त पेट्रोल पंप (Reliance Petrol Pumps) आणि 31 विमान इंधन स्टेशनमध्ये (ATF Stations) 49 टक्के भागीदारीचे अधिग्रहण केले होते. आता हे 1,400 पेक्षा जास्त पेट्रोल पंप जियो-बीपी नावाने रि-ब्रँड केले जातील.

5500 पंप करण्याची योजना
रिलायन्सचे सध्याचे पेट्रोल पंप या संयुक्त उपक्रमात ट्रान्सफर केले होते.
संयुक्त उद्योगांतर्गत 2025 पर्यंत पेट्रोल पंपची संख्या 5,500 पर्यंत करण्याची योजना आहे.
आरबीएमएलमध्ये 51 टक्के भागीदारी रिलायन्सकडे आहे.

 

इंधनाशिवाय मिळतील अनेक सुविधा
ग्राहकांना या स्टेशनवर इंधनासह ईव्ही चार्जिंग सुविधा,
रिफ्रेशमेंट आणि फूड (Refreshment & Food) तसेच कार्बन उत्सर्जन कमी
करण्याचे सोल्यूशन्स (Low Carbon Solutions) उपलब्ध केले जातील.

 

उच्च गुणवत्तेचे पेट्रोल-डिझेल (High Quality Fues) आणि विकल्स लुब्रीकेंट्स (Lubricants) ग्राहकांना दिले जाईल.
येथे ग्राहकांना सामान्य इंधनाऐवजी Additivised Fuel मिळेल. (Reliance Jio-BP)

 

Web Title :- Reliance Jio-BP | reliance jio bp launches first mobility station in navi mumbai many facilities will be available with petrol diesel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC Jeevan Umang | 1302 रुपये प्रीमियम देऊन मिळतील 27.60 लाख रुपये, जाणून घ्या या पॉलिसीबाबत सर्वकाही

Aryan Khan drugs case | कोण आहेत यास्मीन? समीर वानखेडे यांच्यासाठी ज्यांनी केला मंत्री नवाब मलिक यांच्यावर सर्वात मोठा ‘हल्ला’

Pune Cyber Police | मॅट्रोमोनी साईटवरुन लाखोंचा गंडा घालण्याऱ्या दोन नायजेरियन आरोपींना दिल्लीतून अटक

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,370 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी