Reliance Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन 129 रुपयांपासून सुरू ! 56 GB पर्यंत Data आणि अनलिमिटेड Calling

नवी दिल्ली : वृत्त संस्था – रिलायन्स जिओकडे (Reliance Jio) ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स (Recharge Plans) आहेत. जिओच्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅनची (Prepaid Plan) किंमत 129 रुपये आहे. आज आपण जिओच्या (Jio) सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅनबद्दल माहिती घेणार आहोत जे 250 रुपयांच्या आत आहेत. यात 129, 149, 199 आणि 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन्सचा समावेश आहे.

129 रुपयांचा रिचार्ज (Recharge Plans)

या प्लॅनची वैधता (Validity) 28 दिवस असून यात ग्राहकांना 2 GB डेटा मिळतो. 2 जीबी संपल्यानंतर कमी स्पीड होऊन 64Kbps होतो. यात कॉलिंगासाठी (Calling) जिओ नंबरसाठी अनलिमिटेड आणि नॉन जिओसाठी (Non Jio) 1000 मिनिटे मिळतात. जिओ अ‍ॅप्सचा (Jio Apps) अ‍ॅक्सेसही या रिचार्ज पॅकमध्ये मिळतो.

149 रुपयांचा रिचार्ज

या प्लॅनची वैधता 24 दिवसांची आहे. यात ग्राहकांना रोज 1 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 24 GB हायस्पीड डेटा मिळतो. रोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होतो. रोज 100 SMS ग्राहकांना फ्री मिळतात. तसंच जिओ अ‍ॅपची सुविधाही या पॅकमध्ये फ्री मिळते.

199 रुपयांचा रिचार्ज

या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. यात जिओ ग्राहकांना रोज 1.5 GB डेटा मिळतो. याप्रमाणे 42 GB हायस्पीड डेटा मिळतो. यात कॉलिंगासाठी जिओ नंबरसाठी अनलिमिटेड आणि नॉन जिओसाठी 1000 मिनिटे मिळतात.

249 रुपयांचा रिचार्ज

या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. यात रोज 2 GB डेटा या हिशोबानं एकूण 56 जीबी हायस्पीड (High Speed) डेटा मिळतो. यात जिओ नंबरसाठी कॉलिंगासाठी अनलिमिटेड आणि नॉन जिओसाठी 1000 मिनिटे मिळतात. याशिवाय रोज 100 SMS ग्राहकांना फ्री मिळतात. जिओ अ‍ॅप्सची सुविधाही फ्री मिळते.

You might also like