Jio च्या ग्राहकांना मोठा झटका ! कंपनीनं बंद केले सर्वात ‘स्वस्त’ असलेले ‘हे’ 2 प्लॅन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : काही दिवसांपूर्वीच जिओची वार्षिक बैठक पार पडली. यामध्ये बऱ्याच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यातलीच एक घोषणा म्हणजे भविष्यात लवकरच जिओ आणि गूगल मिळून 5G अँड्रॉइड स्मार्टफोन बाजारात आणणार आहेत. तसेच कंपनीजवळ जिओचे निर्मित्ती असणारे फोन अजून खूप शिल्लक आहेत आणि ते स्वस्तही आहेत.

अशातच जिओच्या नवीन स्मार्टफोनची आशा आता ग्राहकांना आहे. ही एक चांगली बातमी असतानाच जिओने त्यांच्या ग्राहकांना एक चांगलाच झटका दिला आहे. झालं असं की, जिओचे जे सर्वात स्वस्त प्लॅन होते ते आता बंद झाले आहेत. हे प्लॅन 49 आणि 69 रुपयांचे होते. हे दोन प्लॅन जिओच्या वेबसाईटवरुन काढून टाकण्यात आले आहेत. हे दोन्ही शॉर्टर वॅलीडीटी प्लॅन होते आणि त्यांची मर्यादा 14 दिवस इतकी होती.

आता जिओचा सगळ्यात कमी शॉर्टर वॅलीडीटी प्लॅन 75 रुपयांचा असेल. 49 आणि 69 रुपयांचे हे दोन रिचार्ज वेबसाईटवरन काढून टाकण्यात आले आहेत. पण याची जिओने अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.