‘Jio फायबर’च्या ग्राहकांना मिळणार नाही TV चॅनलचा ‘अ‍ॅक्सेस’, घ्यावं लागणार दुसरं ‘कनेक्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ऑगस्ट महिन्यात जियो फायबर लॉन्च केले होते. जिओने गीगा फायबरमध्ये ग्राहकांना 699 रुपयांपासून 8,499 रुपयांपर्यंतचे प्लॅन उपलब्ध करुन दिले होते. या ब्रॉडबॅंड पॅकमध्ये ग्राहकांना 100 एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट डाटा मिळतो. याशिवाय कंपनीने ग्राहकांना नव्या कनेक्शनसह 4 के सेट टॉप बॉक्स देण्याची घोषणा केली होती. परंतू आता ग्राहकांना कंपनी टीव्ही चॅनलची सुविधा देणार नाही.

याशिवाय ग्राहकांना टीव्ही चॅनल पाहण्यासाठी वेगळे कनेक्शन खरेदी करावे लागेल. ग्राहकांना कंपनीची भागीदारी असलेले हाथवे आणि डेन सारखे केबल ऑपरेटर्सच्या माध्यमातून टीव्ही कंटेंटची सुविधा देण्यात येईल. याशिवाय ग्राहकांना 4 के तंत्रज्ञानात टीव्ही पाहण्यासाठी एक वेगळे कनेक्शन खरेदी करावे लागेल.

जिओ सेट टॉप बॉक्स संबंधित महत्वाचे मुद्दे
जिओ ग्राहकांना गीगा फाइबर कनेक्शन खरेदी करताना पहिल्यांदा 2,500 रुपये डिपॉजिट करावे लागतील. या रक्कमेतील 1,000 रुपये इंस्टॉलेशन चार्जेस असेल आणि जो रिफंड मिळणार नाही. याशिवाय उरलेली रक्कम जिओ फायबर कनेक्शन सोडताना ग्राहकांना परत करण्यात येईल.

याशिवाय कंपनीने दावा केला होती की ग्राहकांना सेट टॉप बॉक्स देण्यात येईल. म्हणजेच जिओ ग्राहकांना सेट टॉप बॉक्स तर देण्यात येईल, परंतू ते चॅनल पाहू शकणार नाहीत, कंपनीने ही माहिती कमर्शल लॉन्च वेळी दिली होती.

लोकल केबल ऑपरेटरकडून खरेदी करावे लागेल टीव्ही कनेक्शन
जिओ आपल्या ग्राहकांना इंटरनेट प्रोटोकॉल टीव्हीची सेवा देऊ इच्छित होते. परंतू काही कारणाने ही सेवा लॉन्च करण्यात आली नाही. यामुळे ग्राहकांना टीव्ही चॅनल देण्यासाठी कंपनीने हाथवे आणि डेन नेटवर्कची आणखी भागीदारी खरेदी केली.

अन्य केबल कंपन्यांनी आयपीटीव्ही सेवेसंबंधित रिलायन्स जिओला विरोध केला होता. कारण यामुळे त्यांना अत्याधिक नुकसान सोसावे लागणार होते. आता कंपनी लोकन केबल वितरकांच्या मदतीने देशात आपले नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

जर तुम्ही जिओ फाइबर कनेक्शन खरेदी करु इच्छितात तर तुम्हाला सेट टॉप बॉक्स मिळेल. परंतू त्यासह टीव्ही चॅनलची सुविधा मिळणार नाही. परंतू तुम्हाला अनलिमिटेड कॉल आणि 100 एमबीपीएस स्पीडचा डाटा नक्की मिळेल.

Visit : Policenama.com