COVID-19 : रिलायन्स MyJio अ‍ॅपनं लॉन्च केलं नवं ‘टूल’ ! आता घर बसल्या स्वतः ओळखा कोरोना व्हायरसचे ‘लक्षणं’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोना व्हायरस वेगाने पसरत असून त्याच्याशी लढण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एक मोहीम #CoronaHaaregaIndiaJeetega सुरु केली आहे. देशभरात लोकांना याबाबत भीती आहे कि तेही कोरोना व्हायरसने संक्रमित तर नाही ना झाले. जगभरातील रुग्णालये कोविड-19 च्या रुग्णांनी भरली आहेत आणि याचे उपचार सगळ्यांसाठी उपलब्ध करणे अवघड आहे. अशात रिलायन्स जिओने MyJio App मध्ये अनके नवीन फीचर्स जोडले आहेत. ज्यामुळे व्हायरसच्या लक्षणांची तपासणी तुम्ही स्वतःच करू शकता.

MyJio App मध्ये कोरोना व्हायरस टेस्टिंग टूल, घरी कसे काम करेल हे जाणून घेण्यासाठी गाइड, लर्न फ्रॉम होम, घरात राहून डिजिटल टूलद्वारे डॉक्टरांचा सल्ला कसा घेतला जाईल. यासह देशात कोरोना टेस्टिंग सेंटरची लिस्ट दिली गेली आहे. यात जगभरासह भारतात आतापर्यंत समोर आलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे अपडेटेड आकडे आहेत आणि COVID-19 बाबत सामान्य प्रश्नांची उत्तरेही आहेत. याशिवाय सगळ्या क्षेत्रासाठी हेल्पलाइन डिटेलही दिले गेले आहेत. यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे MyJio कोरोना व्हायरसची Symptom टूल आहे, जे कोणासाठीही उपलब्ध केले गेले आहे.

कोणताही नवीन बदल झाला तर MyJio लिस्टही अपडेट होणार
भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदे (ICMR) द्वारे सामायिक केलेल्या टेस्ट सेंटर्सची लिस्टही MyJio अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. भारतात सगळ्या राज्यात आणि क्षेत्रांची सूची उपलब्ध आहे. जर राज्य किंवा क्षेत्राच्या लिस्टमध्ये कोणता बदल झाला तर MyJio लिस्टही अपडेट होईल. तसेच तुम्हाला जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे आकडे अपडेट करायचे असतील तर त्यासाठी अ‍ॅपमध्ये स्टॅटिस्टिक्स टूल आहे.

Reliance Jio ने म्हटले की, कमी धोका असलेले नागरिक या अ‍ॅपच्या मदतीने कोणत्याही गैरसमजाला दूर करू शकतात. मध्यम धोका असलेल्या नागरिकांसाठी आम्ही त्यांना त्यांच्या आजाराबाबत खात्री देऊ शकतो आणि याबाबत माहिती देतो कि त्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे का नाही. उच्च धोका असलेल्या नागरिकांसाठी आम्ही त्यांना योग्य वैद्यकीय मदत करू जेणेकरून ते आयजोलेट राहण्यासह चांगला उपचार केला जाऊ शकेल. MyJio मध्ये कोरोना व्हायरसच्या लक्षणांची कोणतीही चाचणी होऊ शकते. भलेही ते Jio मोबाइल किंवा Jio फायबर यूजर असतील किंवा नसतील.या ऍप मध्ये FAQ सेक्शनही आहे, जिथे कोरोना व्हायरसच्या मिथकांबाबत जोडलेल्या सत्याची माहिती मिळेल.

तुम्ही जास्त माहितीसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर (1075), केंद्रीय हेल्पलाइन नंबर (+ 91-11-23978043), MyGov WhatsApp नंबर (+ 91-9013151515) आणि केंद्रीय हेल्पलाइन ईमेल (ncov2019 @gmail.com) वर मिळवू शकता. राज्यातील लोकं आपापल्या राज्याच्या हेल्पलाइन नंबरवर फोन करू शकतात.

MyJio अ‍ॅपची ही सुविधा अँड्रॉइड फोन किंवा ऍप्पल आयफोनवर सर्व्हर साइड अपडेटच्या माध्यमातून मिळेल. जर तुमचे ऍप अगोदरच अपडेटेड असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. जर ही सुविधा  अ‍ॅपमध्ये दिसत नसेल तर नवीन व्हर्जनसाठी Google Play Store किंवा Apple App Store वर जाऊ शकता.

हे टूल कसे काम करते ?
– My Jio मध्ये तुम्हाला ‘Symptom Checker’ चा ऑप्शन मिळेल. त्याच्या खाली ‘check your symptoms now’ वर क्लिक करायचे. कोरोना व्हायरसची लक्षणे तपासायला सुरु केल्यावर यात सर्वात पहिले चाचणी कशासाठी घेत आहेत हे विचारले जाईल. यात पर्याय आहे – स्वतःसाठी, पती/पत्नीसाठी, मुलांसाठी किंवा मित्रांसाठी तुम्ही ज्याची चाचणी करणार आहात त्याचा पर्याय निवडा.
यांनतर तुम्हाला Gender विचारले जाईल. यात ‘Male, Female आणि Other’ चे पर्यायातील तुमच्यानुसार निवडा.

– यानंतर वयाचा पर्याय असेल १२ वर्षापेक्षा कमी, १२-५० वर्षादरम्यान, ५१-६० वर्षादरम्यान आणि ६० वर्षापेक्षा जास्त.

– तुमच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारले जातील, ज्यात ७ पर्याय असतील. यात अस्थमा, फुफ्फुसाचा आजार, डायबिटीज, इम्युनो-कॉम्प्रोमाइज्ड कंडिशन, गर्भधारणा आणि यातील कोणतेही नाही असा पर्याय आहे. कोणता आजार असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर None of the Above वर क्लिक करा.
नंतर १४ दिवसात तुम्ही किंवा कुटुंबातील कोणी या देशात गेले आहे का? देशाच्या पर्यायात China, Italy, Spain, Iran, Europe, Middle East, Southeast Asia, Country not listed above आणि None of the Above दिले गेले आहे.

– आता प्रश्न असेल मागच्या १४ दिवसात तुम्ही किंवा कुटुंबातील कोणी देशभरात कुठेही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास केला आहे का आणि अशा व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत का, ज्याला सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे.

– यानंतर विचारले जाईल की मागच्या १४ दिवसात तुम्ही किंवा कुटुंबातील कोणी COVID-19 रुग्णाला भेटले होतात का ? यासह Yes आणि No चा पर्याय असेल.

– पुढे प्रश्न असेल तुम्हाला ताप आहे का? यासोबतही Yes आणि No चा पर्याय असेल.

– प्रश्न येईल तुम्हाला डोकेदुखी आहे का? यासोबतही Yes आणि No चा पर्याय असेल.

– आता विचारले जाईल कि तुम्हाला खोकला आहे का? यासोबत Yes आणि No चा पर्याय असेल.

– विचारले जाईल कि तुम्हाला सर्दी आहे का ?

– प्रश्न येईल कि तुमचा घसा खराब आहे का ? यातही Yes आणि No चा पर्याय मिळेल.

– यानंतर प्रश्न असले, तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत आहे का ?

– प्रश्न असेल कि तुमच्या आवाजात जडपणा आहे ?

– तुम्ही दिलेल्या सगळ्या उत्तरांवर आधारित आता रिजल्ट तुमच्या समोर येईल, ज्यात सांगितले जाईल कि तुम्हाला COVID-19 चा किती धोका आहे.