Reliance Jio चे 2 स्वस्त प्लॅन लाँच, 39 अन् 69 रूपयांमध्ये तुम्हाला काय मिळणार हे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन स्वस्त प्लॅन्स लाँच केले आहेत. 39 आणि 69 रूपये अशी या प्लॅन्सची किंमत आहे. या दोन्ही प्लॅन्समध्ये कंपनी ग्राहकांना 14 दिवसांची व्हॅलिडिटी अन् अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देत आहे. परंतु या प्लॅन्सचा वापर केवळ जिओ फोन युझर्सनाच करता येणार आहे.

39 रूपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यापूर्वी कंपनीच्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 75 रूपये होती. 39 रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 दिवसांची वैधता आणि रोज 100 एसएमएस देण्यात येतात. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग अन् रोज 100 एमबी डेटाही देण्यात येतो. याशिवाय ग्राहकांना मोफत जिओ अॅप्सच सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

69 रूपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा 69 रूपयांचा प्लॅन हा 39 रूपयांच्या प्लॅन सारखाच आहे. यात केवळ डेटाचा फरक आहे. यात ग्राहकांना 14 दिवसांची वैधता मिळते. तसेच दररोज 500 एमबी डेटा मिळणार आहे. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग अन् रोज 100 एसएमएसची सुविधा दिली आहे. याशिवाय ग्राहकांना मोफत जिओ अॅप्सच सबस्क्रिप्शनही देण्यात येते. दरम्यान कोरोना संकटामुळे ग्राहकांना दर महिन्याला 300 मिनिट्स मोफत दिले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दररोज 10 मिनिटांच्या हिशोबान ग्राहकांना 300 मिनिट्स दिले जाणार आहे. याशिवाय जिओ फोन रिचार्ज केल्यानंतर त्याच किंमतीचा एक प्लॅनही मोफत देण्यात येणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.