खुशखबर ! आता एका क्लिकवर करता येणार तुम्हाला प्रवास

मुंबई: वृत्तसंस्था – रिलायन्स मार्फत ग्राहकांना खुश करण्यासाठी नेहमीच विविध आकर्षित नवनवीन ऑफर्स आणि सुविधा दिल्या जातात. आता जिओनं ‘जिओ फोन’ आणि ‘जिओ फोन-२’ युजर्ससाठी नवीन ‘जिओ रेल अ‍ॅप’ लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वांना एका क्लिकवर आता रेल्वे तिकीट बुक अथवा ते रद्द देखील करता येणार आहे.

रिलायन्स जिओ हा रेल्वेचा अधिकृत सेवा पुरवठादार आहे. रेल्वे सोबतचं सहकार्य अधिक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून रिलायन्सनं जिओ आता नवीन रेल अ‍ॅप आणले आहे. या अ‍ॅपद्वारे रेल्वेचं तिकीट बुकिंग, तिकीट कॅन्सलेशन, तात्काळ तिकीट आणि पीएनआरसारख्या सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.

काय आहे ही सुविधा वाचा सविस्तर,

या सुविधेसाठी ग्राहकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ई-वॉलेटचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये पीएनआरची माहिती, ट्रेनचा मार्ग आणि ट्रेन किती वेळात स्थानकात पोहोचेल यापासून तर सीट उपलब्ध आहेत कि नाहीत याची देखील ,ताहिती आपणांस मिळणार आहे. आयआरटीसी अ‍ॅपप्रमाणेच ‘जिओ रेल’ अ‍ॅपवर देखील आपणांस तात्काळ तिकीट बुक करता येऊ शकते.पीएनआर स्टेटस चेंज अलर्ट, ट्रेन लोकेटर, आणि फूड ऑर्डरसारख्या सुविधांचा समावेश देखील लवकरच जिओ रेल्वे अ‍ॅपवर मिळणार आहेत. या अ‍ॅपमुळं आता आपल्याला तिकिटासाठी रांगेत ताठककळत उभे राहण्याची आवश्यकत नाही.