Jio नं लॉन्च केले 3 नवीन ‘प्लॅन’, मिळणार ‘हा’ मोठा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Reliance Jio ने तीन नवीन प्लॅन बाजारात आणले असून याला All in one प्लॅन म्हटले जाते. नुकतेच कंपनीने दुसऱ्या नेटवर्कवर फोन करणाऱ्या ग्राहकांना प्रतिमिनिट शुल्क लागू केले होते. त्यानंतर आता कंपनीने आणखी तीन प्लॅन बाजारात आणले असून यामध्ये तुम्हाला जास्त डेटाबरोबरच अनलिमिटेड नॉन जियो कॉलिंग देखील मिळणार आहे. यामध्ये 1000 मिनिट दुसऱ्या नेटवर्कवर फोन लावू शकतात.

222 रुपयांचा प्लॅन
28 दिवसांचा हा प्लॅन असून यामध्ये तुम्हाला 2GB डेटा प्रतिदिन मिळणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या नेटवर्कवर तुम्ही 1000 मिनिट फोन करू शकता.

333 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन दोन महिन्याच्या व्हॅलिडिटीचा असून यामध्ये प्रतिदिन तुम्हाला 2GB डेटा मिळणार असून यामध्ये देखील दुसऱ्या नेटवर्कवर तुम्ही 1000 मिनिट फोन करू शकता.

444 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची व्हॅलिडिटी हि तीन महिन्यांची असून यामध्ये प्रतिदिन 2GB डेटा मिळणार असून यामध्ये देखील दुसऱ्या नेटवर्कवर तुम्ही 1000 मिनिट फोन करू शकता. त्याचबरोबर एसएमएसची देखील सुविधा देण्यात आली असून जुन्या प्लॅनच्या तुलनेत जास्त डेटा मिळणार आहे. तसेच 80 रुपयांची बचत देखील होणार आहे. मात्र 1000 मिनिटांची वैधता संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत.

Visit  :Policenama.com

You might also like