खुशखबर ! Jio च्या ‘या’ प्लॅनवर रोज मिळवा 5 GB डेटा आणि बरचं काही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायंस जियो आपले यूजर्स कायम ठेवण्यासाठी नवनवीन ऑफर सादर करत आहेत. जिओचे स्वस्त आणि जास्त डेटा मिळणारे अनेक प्लॅन आहेत. जिओकडे सध्या दररोज 1.5 जीबी डेटापासून 5 जीबी डेटापर्यंतचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत. प्रत्येक प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग, 100 एसएमएस मोफत आणि जिओ मोबाइल अ‍ॅप्स फ्री सबस्क्रिप्शन यांसारख्या ऑफर उपलब्ध आहेत.

जाणून घ्या जियोचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन –

1) जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन 149 रुपयांचा आहे. त्याची वैधता 28 दिवसांपर्यंत असून दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो.

2) जिओचा दुसरा प्लॅन 198 रुपयांचा आहे. त्याची वैधता 28 दिवसांपर्यंत असून दररोज 2 जीबी डेटा ऑफर केला आहे.

3) जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. त्याची मुदत 28 दिवसांची आहे.

4) जिओच्या 398 रुपयांच्या प्लॅनची वैधता 70 दिवसांची आहे. त्यात दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे.

5) जिओचा 449 रुपयांच्या प्लॅनची वैधता 91 दिवसांची आहे. त्यात दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे.

6) जिओच्या 498 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची मुदत 91 दिवसांची आहे. त्यात दररोज 2 जीबी डेटा मिळेल.

7) मोबाइल इंटरनेटवर व्हिडिओ पाहत असाल तर 509 रुपयांचा जिओ प्लान तुमच्यासाठी उत्तम आहे. यात 28 दिवसांच्या मुदतीसह ग्राहकांना रोज 4 जीबी डेटा मिळतो.

8) जिओचा 799 रुपयांचाही प्लॅन आहे. त्याची मुदत 28 दिवसांची असून दररोज 5 जीबी डेटा मिळेल.

Visit – policenama.com 

You might also like