फायद्याची गोष्ट ! Jio चा भन्नाट प्लॅन, Vodafone आणि Airtel ला बसू शकतो मोठा झटका, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – रिलायन्स जिओ सब्सिडीच्या सिम लॉक्ड स्मार्टफोन करिता चायनीज मोबाइल निर्माता कंपनीसोबत आपली डील फायनल करणार असून, जिओ आणि इतर टेलिकॉम कंपन्यात मोठी टक्कर होणार आहे. रिलायन्स जिओचे हे स्मार्टफोन्स ४ जी डेटा, व्हाइस आणि स्वतः कॉन्टेंट सर्विस सोबत मिळतील. कंपनीने चिच्या आयटेल ब्रँडसोबत पहिला टायअप केलं असून, यामाध्यमातून ३ ते ४ हजार रुपयांच्या किंमतीचे स्मार्टफोन बाजारात आणले जातील.

जिओ गुगल पार्टनरशी अंतर्गत डेव्हलप होतील फोन

जिओ आणि गुगल पार्टनरशीप अंतर्गत नवीन स्वस्त स्मार्टफोन बनवले जातील. तसेच ३५ कोटी फिचर फोन ग्राहकांना आपल्या नेटवर्कसोबत जोडण्याचे जिओचे पार्टनरशीपच्या माध्यमातून टार्गेट आहे. यातील जास्तीत जास्त ग्राहक जिओचे प्रतिस्पर्धी एअरटेल आणि व्होडाफोनचे आहेत.

एअरटेल सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन बाजारात आणणार

ईटीच्या बातमीनुसार, एअरटेल सुद्धा काही मोबाइल बनवणाऱ्या कंपन्यांसोबत २ ते २.५ हजार रुपयांच्या सब्सिडाइज्ड सिम लॉक्ड स्मार्टफोन्सबाबत चर्चा करत आहे. एअरटेल ही देशातील सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे. व्होडाफोन-आयडिया २G/३G वापरकर्त्यांची संख्या १३.८ कोटी आहे.

२ जी मुक्त भारत प्रोजेक्टचा जिओ भाग

इंडियन ब्रँडच्या एग्झक्यूटिवने सांगितले की, एका बाजूस आयटेल iTel शी पार्टनरशीप झाली आहे. दुसऱ्या बाजूस स्मार्टफोनसाठी इंडियन हॅंडसेट्स ब्रँडसोबत पार्टनरशीप करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जीओ हा २ जी मुक्त भारत प्रोजेक्टचा भाग आहे.

सुरुवातीस १ कोटी मोबाइलची ऑर्डर

आणखी एका इंडियन ब्रँडच्या एग्झक्यूटिवने म्हटले की, स्वस्त ४ जी स्मार्टफोनसाठी इंडियन हँडसेट्स प्लेयर्स आणि ग्लोबल कॉन्टॅक्ट मॅन्यूफॅक्चरर्स सोबत चर्चा सुरु आहे. कंपनी या डिव्हाइसला जिओ ब्रँड आणि गुगलची पार्टनरशीप सोबत लाँच करु शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ सुरुवातीस १ कोटी स्मार्टफोनची ऑर्डर देण्यासाठी इच्छुक आहे.