फायद्याची गोष्ट ! Jio चे 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 2 प्लान, 84GB डेटा मिळणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीची अनेक प्लान ऑफर करते. लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना जास्त डेटा असलेले प्लान हवे असतात. काही ग्राहकांना जास्त वैधता असलेले प्लान हवे असता. अशा ग्राहाकांसाठी 400 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लानसंबधी माहिती आज देत आहोत. या प्लानमध्ये ग्राहकांना 84 जीबी डेटा मिळतो. या दोन प्लानपैकी एका प्लानमध्ये दररोज 3जीबी डेटा मिळतो. तर दुसरा प्लान हा दुप्पट वैधता असलेला प्लान आहे.

399 रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा चा प्रीपेड प्लान आहे. 399 रुपयांच्या या प्लानमध्ये 56 दिवसांची वैधता आहे. या प्रमाणे ग्राहकांना एकूण 84 जीबी डेटा मिळतो. युजर्सना जिओ ते जिओ व अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 200 नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

349 रुपयांचा प्लान

जिओच्या 349 रुपयांच्या प्लानमध्ये केवळ 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज 3 जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना 84 जीबी डेटा दिला जातो. यामध्ये युजर्संना जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 1 हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

कोणता प्लान बेस्ट

जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत असाल तर तुमच्यासाठी 349 रुपयांचा प्लान अधिक बेस्ट आहे. कारण या प्लानमध्ये रोज 3 जीबी डेटा दिला जातो. जर तुम्हाला डेटासोबत वैधता जास्त हवी असेल तर 399 रुपयांचा प्लान तुमच्यासाठी बेस्ट प्लान आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like