Jio चा 84 दिवसांचा जबरदस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंग आणि जास्त डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीतील प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. जिओकडे 2 जीबी, 3 जीबी, 1.5 जीबी आणि 1 जीबी डेटा रोज मिळणारे प्लान आहेत. जिओच्या प्लानमध्ये वेगवेगळी वैधता असणारे प्लान आहेत. यामध्ये 84 दिवसांची वैधता असलेले जबरदस्त प्लान जिओकडून आपल्या ग्राहकांना ऑफर केले जात आहेत. 84 दिवसांची वैधता असलेले एकूण 3 प्लान जिओकडून ऑफर केले जात आहे. 599, 555 आणि 999 असे जिओचे तीन प्लान असून याची वैधता 84 दिवसांची आहे.

जिओचा 999 रुपयांचा प्लान

जिओच्या या 999 रुपयांच्या प्लानची वैधता 84 दिवसांची असून या पॅकमध्ये रोज 3 जीबी डेटा म्हणजेच 252 जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps होतो. यामध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि अन्य नेटर्कवर कॉलिंगसाठी तीन हजार मिनिट्स मिळतात. तसेच 100 एसएमएस फ्री मिळतात. याशिवाय जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

जिओचा 599 रुपयांचा प्लान

या प्लानची देखील वैधता 84 दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज 2 जीबी डेटा म्हणजे 169 जीबी डेटा मिळतो. रोज मिळणाऱ्या डेटाची लिमिट संपल्यानंतर 64Kbps स्पीडने इंटरनेट मिळते. याशिवाय जिओ ते जिओ अनलिमिटेड आणि जिओ वरुन दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 3 हजार मिनिट्स मिळतात. तसेच 100 एसएमएस फ्री मिळतात. याशिवाय जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

जिओचा 555 रुपयांचा प्लान

जिओच्या या प्लानची वैधता 84 दिवसांची असून या पॅकमध्ये रोज 1.5 जीबी डेटा या प्रमाणे 126 जीबी डेटा मिळतो. रोज मिळणाऱ्या हाय स्पीडच्या डेटाची लिमिट संपल्यानंतर 64kbps स्पीडने डेटाचा वापर करता येतो. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी जिओच्या या पॅकमध्ये 3 हजार कॉलिंग मिळते. जिओ ग्राहकांना 100 एसएमएस फ्री मिळतात. याशिवाय जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.