फायद्याची गोष्ट ! Jio ची ‘या’ स्मार्टफोन युजर्ससाठी जबरदस्त ऑफर, दुप्पट डेटासह एक वर्षाची ‘फ्री’ सर्व्हिसही मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपनी जिओने मोटोरोलाच्या नव्या Motorola Razr 2019 स्मार्टफोनसाठी eSIM सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. भारतात जिओची ई सिम सेवा पहिल्यापासूनच उपलब्ध आहे. परंतु Moto Razr युजर्ससाठी ही खास ऑफर आणण्यात आली आहे. यात ग्राहकांना डबल डेटा आणि डबल वैधता देण्यात आली आहे. जिओ ई सिमद्वारे यूजर्स मोटो रेजर स्मार्टफोनच्या माध्यमातून कॉल करु शकतात.

यात यूजर्स जिओ डाटा आणि जिओ अ‍ॅप्सचा वापर देखील करु शकतात. विशेष म्हणजे या सर्व सेवा जिओच्या फिजिकल सिमकार्डशिवाय उपलब्ध होतील. म्हणजेच मोबाइलमध्ये कोणतेही सिम टाकण्याची आवश्यकता नाही. याशिवाय मोटो रेझरच्या यूजर्सला ही सेवा 1 वर्ष अनलिमिडेट सर्विससह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळेल. याशिवाय 4,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये डबल डाटाचा फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 350 जीबी + 350 जीबी हायस्पीड डेटा कोणत्याही डेली लिमिट शिवाय मिळेल. याशिवाय 1 वर्ष अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंगची सेवा देखील उपलब्ध होईल. म्हणजे यूजर्सला एकूण 14 हजार 997 रुपयांचे बेनिफिट्स मिळेल.

Motorola Razr चे स्पेसिफिकेशन्स –
मोटोरोलाने आपला आयकॉनिक Motorola Razr 2019 हा फोल्डेबल स्मार्टफोन सोमवारी लाँच केला. Moto Razr हा जगातील पहिला कॅमशेल स्टाइलचा फोल्डेबल डिस्प्ले स्मार्टफोन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनबाबत चर्चा रंगली होती की हा फोन कसा असणार?

यात 6.2 इंच फ्लेक्सिबल ओलेड एचडी+ (876×2142 पिक्सल) डिस्प्ले असून डिस्प्ले पॅनलला पूर्ण फोल्ड करता येते. फोनमध्ये एक सेकंडरी 2.7 इंच ओलेड क्विक व्ह्यू स्क्रीन आहे. या स्क्रीनचा वापर तुम्ही सेल्फी घेण्यासाठी, नोटिफिकेशन पाहण्यासाठी आणि म्यूझिक कंट्रोल व गुगल असिस्टंटसाठी करु शकतात.

याशिवाय क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आणि 6 जीबी रॅम आहे. नाइट व्हिजन मोडसह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून अंधारातही ब्राइट फोटो घेता येईल असा दावा कंपनीने केला आहे. कॅमेऱ्यामध्ये ऑटो सीन डिटेक्शन, पोर्ट्रेट लायटिंग आहे. फोन फोल्ड केल्यानंतर हा कॅमेरा सेल्फीसाठीही वापरता येतो.

हँडसेटच्या मुख्य डिस्प्ले नॉचच्या वर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 205 ग्रॅम वजन असलेल्या या फोनमध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मेमरी असून हा फोन अँड्रॉइड 9 पायवर कार्यरत असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4 जी, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप-सी यांसारखे फीचर्स आहेत. तर, 2510 mAh क्षमतेची 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी आहे. ही बॅटरी एक दिवसाचा बॅकअप देईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

काय असणार किंमत –
Motorola Razr या स्मार्टफोनची किंमत 1,24,999 रुपये असणार आहे. सोमवारपासून प्री बुकिंगला सुरुवात झाली आहे. ही विक्री 1 एप्रिल पर्यंत चालेल. फ्लिपकार्ट आणि काही ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून फोनची प्री बुकिंग सुरु झाली आहे, अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत 1,500 डॉलर म्हणजे 1 लाख 11 हजार रुपये आहे.