Reliance Jio Recharge Plans | 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात Jio चे ‘हे’ प्लान, मिळतात दररोज रोज 1.5GB सह अनलिमिटेड कॉलिंग आणि ‘या’ गोष्टी फ्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Reliance Jio Recharge Plans | रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास योजना ऑफर (Reliance Jio Recharge Offer) करते. ज्यामध्ये तुम्ही अधिक डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. मात्र, या योजना थोड्या महाग असू शकतात. पण आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत अधिक डेटा, अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि इतर सेवांचा लाभ मिळू शकतो. (Reliance Jio Recharge Plans)
199 रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओने ऑफर केलेला जिओचा एक प्लॅन 199 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. तसेच यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. याशिवाय तुम्ही Jio TV आणि Jio Cinema अॅपचा मोफत लाभ घेऊ शकता. हा प्लान 23 दिवसांच्या वैधतेसह येतो.
119 रुपयांचा प्लान
या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबीच्या हिशेबाने 21 जीबी डेटा, 14 दिवसांसाठी 300 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय तुम्ही जिओच्या सेवा जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचाही लाभ घेऊ शकता. (Reliance Jio Recharge Plans)
1 जीबी डाटा प्लान
दुसरीकडे, जर तुम्हाला कमी डेटा प्लान वापरायचा असेल आणि दररोज 1जीबी डेटा खर्च करायचा असेल, तर तुम्हाला जास्त दिवसांसाठी वैधता दिली जाते. यासोबतच तुम्हाला इतर काही सेवांचा लाभही मिळतो. या सेगमेंटमध्ये तीन रिचार्ज योजना आहेत.
179 रुपयांचा प्लान
या प्लॅनमध्ये तुम्हाला 1जीबी डेटानुसार दररोज 24जीबी डेटा दिला जातो. दररोज 100 एसएमएस सोबत, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सुविधा अमर्यादित कॉलिंग आणि सबस्क्रिप्शनमध्ये दिली जाते. त्याची वैधता 24 दिवसांसाठी आहे.
149 रुपयांचा प्लान
यामध्ये तुम्हाला 20 दिवसांसाठी 1 GB/day या हिशेबाने 20जीबी डेटा दिला जातो.
यासोबतच तुम्हाला दररोज 100 एसएमएस सुविधेचा लाभही दिला जातो. याशिवाय जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा दिले आहेत.
209 रुपयांचा प्लान
याशिवाय, जर तुम्ही थोडे जास्त पैसे खर्च केले तर 28 दिवसांसाठी तुम्हाला 1 जीबी/दिवस प्लान दिला जातो.
यासोबतच अनलिमिटेड, 100 एसएमएस आणि JioTV आणि जिओ सिनेमा यासारख्या सुविधा आहेत.
डाटा व्हाउचर प्लान
जर तुमच्याकडे आधीच रिचार्ज असेल, परंतु प्रत्येक दिवसाचा डेटा कोटा संपला असेल, तर डेटा व्हाउचर योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
121 रुपयांमध्ये 12जीबी डेटा, 61 रुपयांमध्ये 6 जीबी आणि 25 रुपयांमध्ये 2 जीबी डेटा दिला जातो.
या सर्वांची वैधता तुमच्या अमर्यादित रिचार्जपर्यंत वैध राहते. याशिवाय 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी 30 जीबी डेटा मिळतो.
Web Title :- Reliance Jio Recharge Plans | reliance jio of rs 200 recharge plans gave 1.5 gb data per day unlimited calling sms and more
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sharad Pawar | MIM च्या आघाडीत येण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…