JioPhone युजर्संना ‘झटका’, कंपनीनं बंद केला सर्वात ‘स्वस्त’ प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 6 डिसेंबर रोजी जिओने आपल्या प्लॅनमध्ये बदल करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यानुसार जिओच्या प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. मात्र जिओ फोनने आपल्या दरामध्ये कोणताही बदल केला नव्हता आता देखील जिओ फोनने आपल्या दरात वाढ केलेली नाही. मात्र जिओ फोनने आपला 49 रुपयांचा सगळ्यात स्वस्त प्लॅन बंद केला आहे. आता 75 रुपयांपासून जिओच्या प्लॅनची सुरुवात होईल.

जिओ फोन ग्राहकांसाठी 99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपये असे प्लॅन देखील उपलब्ध आहेत. परंतु ग्राहकांना नॉन जिओ मिनिटांसाठी IUC टॉपअप रिचार्ज करावे लागेल.

रिलायन्स जिओच्या जिओफोनने 1,500 रुपयांच्या किंमतीमुळे लाखो ग्राहकांना आकर्षित केले.  जिओफोन वापरकर्त्यांसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी 49 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये जिओ विना FUP अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 28 दिवसांसाठी 1 जीबी डेटा देत असे, IUC टॉप-अप व्हाउचर आल्यानंतर, 49 रुपयांचा प्लॅन खरेदी केलेल्या ग्राहकांना IUC टॉप-अप रिचार्ज करावे लागत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आता या प्लॅनला बंद करण्यात आले आहे. गेल्या वेळेस जिओने आपल्या दरामध्ये वाढ करत प्लॅन उपडेट केले होते. मात्र जिओ फोनचे प्लॅन अपडेट झाले नसल्याने आता त्यांची सुरुवात 75 रुपयांपासून पुढे होणार आहे.

गेल्या महिन्यात रिलायन्स जिओने ऑल इन वन प्लॅन लॉंच केला होता. यामध्ये नॉनजीओ मिनिट्स देखील उपलब्ध होते. यामध्ये 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये आणि 185 रुपयांच्या जिओ प्लॅनचा समावेश आहे. 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित जिओ टू जिओ कॉलिंग, 500 मिनट नॉन जिओ कॉलिंग, दररोज 100 MB डेटा आणि 50 एसएमएस 28 दिवसांसाठी देण्यात येणार आहे.

Visit : policenama.com

Loading...
You might also like