Jio नं आणला सर्वात ‘महागडा’ डेटा प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगही नाही, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओ पुन्हा एकदा सर्वात महागडा प्लॅन घेऊन आले आहे. विशेष म्हणजे हा ४,९९९ रुपयांचा असून याची वैधता फक्त वर्षभर आहे. यासोबत दर दिवसाला १ जीबी डेटा मिळत असून जिओचे युजर्स सर्वात जास्त डेटाचा वापर करत असतात. या अनुषंगानेच हा प्लान आणल्याचे समोर येत आहे. जीओचा हा प्लॅन लाँग टर्म वैधता आणि डेटा प्लॅनपेक्षा महाग आहे. विशेष म्हणजे एअरटेल आणि व्होडाफोनच्या सर्वात महागड्या प्लॅनपेक्षाही जिओचा हा प्लान जवळपास दुपटीच्या फरकाने महाग आहे. मागील वर्षी डिसेंबर पासून जिओने आपले डेटा प्लॅन महाग केले आहेत, यामुळे आता जिओचे युसर्स देखील कमी झाले आहेत. जाणून घेऊया जिओच्या या महागड्या प्लानविषयी…

जिओचा ४९९९ चा प्लॅन
रिलायन्स जीओचा हा प्लॅन आजवरचा सर्वात महागडा प्लॅन ठरला आहे. यामध्ये केवळ ३५० जीबी डेटा मिळणार असून वैधता फक्त ३६० दिवसाची आहे. युजर्सना दरदिवसाला १ जीबी डेटा मिळणार असून ३५० जीबी डेटा एकाचवेळी देखील वापरता येणार आहे. डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ६४ केबीपीएस इतका होईल. तसेच जिओ नंबर्सवरून अनलिमिटेड कॉलिंग मिळणार असून अन्य नेटवर्कसाठी १२०० मिनिटं देण्यात येणार आहेत. तसेच दरदिवसाला १०० एसएमएस आणि अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील फ्री मिळणार आहे.

या प्लॅनमध्ये १ जीबी डेटाची किंमत १४.२९ रुपये
तसेच या प्लॅनमध्ये १ जीबी डेटाची किंमत साधारणपणे १४.२९ रुपये इतकी आहे. तर जिओच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये डेटाची किंमत ४.२० रुपयांपर्यंत आहे. जर तुम्ही जिओच्या २१२१ रुपयांच्या प्लॅननबद्दल विचार केला तर या प्लॅनमध्ये १ जीबी डेटाची किंमत ४.२० रुपये आहे. तर ५५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबी डेटाची किंमत ४.४० रुपये इतकी आहे. तसेच जिओच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये बघितले तर १ जीबी डेटाची किंमत ४.७५ रुपये आहे. तर १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबी डेटाची किंमत ४.७४ रुपये इतकी आहे. तसेच ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबी डेटाची किंमत ४.१५ रुपये, ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबी डेटाची किंमत ३.५६ रुपये आणि ४४४ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबी डेटाची किंमत ३.९६ रुपये इतकी आहे.

जिओच्या लाँग टर्म प्लॅनपेक्षा जास्त महाग
हा प्लॅन जिओच्या इतर लाँग टर्म प्लॅनपेक्षा अधिक महाग आहे. जिओचे १२९९ आणि २१२१ रुपयांचे असे दोन लाँग टर्न प्लॅन आहेत. २१२१ रुपयांच्या प्लॅनमध्ये दर दिवसाला १.५ जीबी म्हणजेच ५०४ जीबी डेटा मिळत असून या प्लॅनची वैधता सुमारे ३३६ दिवसांची आहे. तर १२९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त २४ जीबी डेटा मिळत असतो. मात्र, याची वैधता ३३६ दिवसांची आहे.

एअरटेल आणि व्होडाफोनपेक्षा दुपटीनं महाग
जिओचा हा प्लॅन एअरटेल आणि व्होडाफोनच्या लाँग टर्म प्लॅनपेक्षा दुपटीनं महाग आहे. एअरटेल आणि व्होडाफोनच्या लाँग टर्म प्लॅनला ३६५ दिवसांची वैधता असते. तसेच १.५ जीबी डेटा देखील मिळतो आणि एअरटेलच्या या प्लॅनची किंमत २३९८ रुपये इतकी आहे. तर व्होडाफोनच्या प्लॅनची किंमत २३९९ रुपये इतकी आहे. तसेच एअरटेलच्या प्लॅनमध्ये विंक म्युझीकवर अनलिमिटेड साँग्स डाउनलोड करता येतात तसेच एक्स्ट्रीम अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन, फास्टॅगवर १५० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. तर व्होडाफोनच्या या प्लॅनवर झी ५ चे ९९९ रुपयांचे सब्सक्रिप्शन, व्होडाफोन प्लेवर ४९९ रुपयांचे सब्सक्रिप्शन देखील दिले जाते. त्यामानाने जीओचा हा प्लॅन खूप महाग असल्याचे समोर येत आहे.